त्र्यंबकेश्वरला देवस्थान ट्रस्टतर्फे गुरुपासून वार्षिक रथोत्सव यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 07:17 PM2018-11-19T19:17:13+5:302018-11-19T19:20:19+5:30
त्र्यंबकेश्वर : श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे सालाबाद प्रमाणे व पुर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार या वर्षीदेखील कार्तिक पौर्णिमा तथा वैकुंठ चतुर्दशी अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वार्षिक रथोत्सव सोहळा बुधवारपासून सुरु होत आहे. हा सोहळा दोन दिवस संपन्न होत असुन मुख्य सोहळा गुरु वारी (दि.२२) रोजी संपन्न होईल.
त्र्यंबकेश्वर : श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे सालाबाद प्रमाणे व पुर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार या वर्षीदेखील कार्तिक पौर्णिमा तथा वैकुंठ चतुर्दशी अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वार्षिक रथोत्सव सोहळा बुधवारपासून सुरु होत आहे. हा सोहळा दोन दिवस संपन्न होत असुन मुख्य सोहळा गुरु वारी (दि.२२) रोजी संपन्न होईल.
ज्योर्तिलिंग त्र्यंबकेश्वर मंदीराचा रथोत्सव सोहळा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे दरवर्षी पारंपारीक पध्दतीने साजरा केला जातो. यानिमित्ताने विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी ज्या सरदार रघुनाथ विंचूरकर यांनी ज्योर्तिलिंग भगवान त्र्यंबकराजाला २२ फुट उंचीचा शिसवी लाकडापासुन तयार केलेला भव्य कोरीव नक्षीकामाची कलाकुसर केलेला रथ बहाल केला आहे. सरदार रघुनाथराव विंचुरकर घराण्याच्या वतीने त्यांचे पुरोहित विलास अग्निहोत्री देवस्थान ट्रस्टतर्फे बुधवारी (दि.२१) दुपारी १.३० ते ४ पर्यंत तसेच रात्री १० ते उत्तररात्री १ वाजेपर्यंत वैकुंठीची विशेष महापुजा पालखी सोहळा व हरिहर भेट सोहळा संपन्न होणारईल.हा सोहळा अवर्णनीय असतो.
त्याचप्रमाणे गुरु वारी (दि.२२) रोजी दुपारी ३.३० वा. प्रत्यक्ष रथोत्सवास सुरु वात होणार असुन भगवान त्र्यंबक राजाची रथातुन सवाद्य पालखी मिरवणुक मेनरोडने निघेल. कुशावर्तावर स्नानादि महापुजा होईल. साधारणत: ६ वाजता सायंकाळी रथयात्रा मंदीराकडे परतीकडे मार्गक्र मण करेल. मधल्या वेळेत रथापुढे आकर्षक शोभेच्या दारुची आतषबाजी व विद्युत रोषणाई देवस्थान ट्रस्टतर्फे केली जाते. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक, यात्रेकरु हजेरी लावतात. रात्री ८ वाजता दीपमाळेची पुजा होऊन रात्री दीपमाळ लावतात. त्यानंतर पुनश्च शोभेच्या दारुची आतषबाजी करण्यात येते.
संपुर्ण गावात उत्साह ओसंडून वाहत असतो. गावात सुखशांती समृद्धी यावी, गावात कुठलीही रोगराई येऊ नये पाऊस,पाणी चांगला पडावा यासाठी याच दिवशी सकाळी ११.३० वा. ग्रामदेवता महादेवीला गाडाभर भातबळी दिला जातो. बळीची ही प्रथा पारंपारीक पध्दतीने चालत आलेली आहे.