त्र्यंबकेश्वरला ई-हुंडी प्रणाली

By Admin | Published: March 6, 2017 01:04 AM2017-03-06T01:04:48+5:302017-03-06T01:04:59+5:30

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग देवस्थान येथे स्टेट बँक आॅफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांच्या हस्ते ई-हुंडी प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला.

Trimbakeshwar e-Hundi system | त्र्यंबकेश्वरला ई-हुंडी प्रणाली

त्र्यंबकेश्वरला ई-हुंडी प्रणाली

googlenewsNext


 त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग देवस्थान येथे स्टेट बँक आॅफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांच्या हस्ते ई-हुंडी प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. या सेवेच्या उपलब्धतेमुळे भाविकांना कार्ड स्वाइप करून आॅनलाइन पद्धतीने देणगी जमा करता येणार आहे.
भाविकांचे श्रद्धास्थान अशी ओळख असलेल्या त्र्यंबक राजाच्या मंदिरात ई-हुंडी प्रणाली सेवेचा शुभारंभ करण्यात आल्याने भाविकांची सोय झाली आहे. यावेळी भट्टाचार्य यांनी स्वत:चे डेबीट कार्ड स्वाइप करून देवस्थानला आॅनलाईन देणगी दिली. यावेळी स्टेट बँक आॅफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक दीपनकर बोस, सलानी नारायण त्र्यंबकेश्वर शाखेच्या प्रमुख सीमा पहाडी, विश्वस्त श्रीकांत गायधनी, सचिन पाचोरकर, जयंतराव शिखरे, व्यवस्थापक राजाभाऊ जोशी, प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य उपस्थित होते.
अरूंधती भट्टाचार्य यांनी ‘कॅशलेस‘ संकल्पना वेगाने
वाढते आहे; मात्र त्या करिता ग्रामीण भागात कनेक्टिव्हीच्या अडचणी येतात त्यामुळे ग्राहक रोख व्यवहाराकडे वळतो. यासाठी इंटरनेट सुविधा वाढवायला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याच कार्यक्रमात कळवण येथील गुरुदत्त विद्यालयास स्कूलबसची चावी देण्यात आली. दरम्यान, पाचोरकर यांनी मंदिरास ‘कॅश डिपॉझिट यंत्रणा’ मिळण्याची मागणी केली होती; मात्र तांत्रिक कारणास्तव ते शक्य झाले नाही. किमान ई-हुंडी सेवा देण्यात आल्याने भाविकांची सोय होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. उपस्थितांचे स्वागत अ‍ॅड. श्रीकांत गायधनी यांनी केले. (वार्ताहर) त्

Web Title: Trimbakeshwar e-Hundi system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.