त्र्यंबकेश्वरला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; नगरविकास विभागाने जारी केला शासन निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 12:48 IST2025-03-28T12:47:39+5:302025-03-28T12:48:21+5:30

या निर्णयामुळे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या विकासाला चालना मिळणार आहे

Trimbakeshwar gets ‘A’ class pilgrimage status; Urban Development Department issues government decision | त्र्यंबकेश्वरला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; नगरविकास विभागाने जारी केला शासन निर्णय

त्र्यंबकेश्वरला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; नगरविकास विभागाने जारी केला शासन निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नाशिकमध्ये सन २०२७ मध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या विकासाला चालना मिळणार आहे. नगरविकास विभागाने गुरुवारी या संदर्भातील शासन निर्णय जारी केला.

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर हे  देशातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक जागृत देवस्थान असून,  दक्षिण भारतातील अत्यंत पवित्र स्थळांपैकी  एक आहे. दर १२ वर्षांनी होणारा  सिंहस्थ कुंभमेळा, गंगा गोदावरी उत्सव, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा, श्रावण महिना प्रदक्षिणा यासारख्या अनेक धार्मिक कार्यक्रमांमुळे भाविक मोठ्या प्रमाणात त्र्यंबकेश्वरला येत असतात. या पार्श्वभूमीवर त्रिंबक नगर परिषद क्षेत्रात पायाभूत सुविधा आणि इतर विकासकामांसाठी त्रिंबक नगर परिषदेला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा ठराव नगरपरिषदेने मंजूर केला होता.नाशिक विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारला प्रस्ताव सादर केला होता.
 नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने  निर्णय घेत राज्य सरकारला  श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरला ‘अ’  तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची शिफारस केली होती. 

Web Title: Trimbakeshwar gets ‘A’ class pilgrimage status; Urban Development Department issues government decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.