त्र्यंबकेश्वर मॅरेथॉनवर नाचलोंढीच्या धावपटूंचे वर्चस्व!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:39 AM2018-03-01T00:39:48+5:302018-03-01T00:39:48+5:30
येथील हरित ब्रह्मगिरी व यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मॅरेथॉन स्पर्धेत नाचलोंढी येथील धावपटू वर्षा चौधरी व ठाणापाडा आश्रमशाळेतील मंदा निखंडे यांनी या स्पर्धेवर वर्चस्व मिळविले. वयोगटानुसार १ कि.मी., २ कि.मी., ३ कि.मी, व ४ कि.मी. सह तर मोठ्या ग्रुपसाठी हिल रन ७ कि. मी.च्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना उत्कृष्ट प्रतिसाद लाभला.
त्र्यंबकेश्वर : येथील हरित ब्रह्मगिरी व यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मॅरेथॉन स्पर्धेत नाचलोंढी येथील धावपटू वर्षा चौधरी व ठाणापाडा आश्रमशाळेतील मंदा निखंडे यांनी या स्पर्धेवर वर्चस्व मिळविले. वयोगटानुसार १ कि.मी., २ कि.मी., ३ कि.मी, व ४ कि.मी. सह तर मोठ्या ग्रुपसाठी हिल रन ७ कि. मी.च्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. जव्हार फाटा (कॉलेजजवळ) येथून तर स्वामी सागरानंद आश्रम व त्याही पुढे कि.मी.प्रमाणे धावण्याचा मार्ग होता. त्यात लहान गटापासून ते ७ कि.मी.पर्यंतच्या धावण्याच्या स्पर्धेपर्यंत नाचलोंढी पर्यायाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल परिसरातील युवती व युवक धावपटूंनी बाजी मारली. येथील हरित ब्रह्मगिरी व यूथ फाउंडेशन तसेच डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने या मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. अर्थात संकल्पना होती, यूथ फाउंडेशनचे युवा नगरसेवक सागर उजे व हरित ब्रह्मगिरी ग्रुपचे व डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. पंकज बोरसे यांची. या धावपटू आंतरराष्ट्रीय स्तराला गवसणी घालणार याची प्रचिती, चुणूक यावेळेस अनुभवण्यासाठी या मॅरेथॉनच्या निमित्ताने पहावयास मिळाले. यासाठी नाशिकहून खास स्पर्धा पाहण्यासाठी वैभव पाटील नूतन पाटील, त्र्यंबकेश्वरचे डॉ. भागवत लोंढे, किरण कांबळे, रोहित शेजवळ, मयूर गाजरे, सचिन काळे आदी डॉक्टर्स तर यूथचे सागर उजे, योगेश भांगरे, श्रीपाद येले, जय घागरे, विकास चव्हाण, वेदांग फडके आदींचेही बहुमोल सहकार्य लाभले.
या स्पर्धेतील विजयी झालेले धावपटू पुढीलप्रमाणे :
४ २ कि.मी. मुली : लक्ष्मी दिवे नाचलोंढी (प्रथम), निर्मला चौधरी हरसूल (द्वितीय), रेश्मा गायकवाड (तृतीय)
४ ३ कि.मी. मुले : महेश वाखने हरसूल (प्रथम), वसंत चौधरी गिरणारे (द्वितीय), पवन घाटाळ हरसूल (तृतीय)
४७ कि.मी.मुली : विनता भोंबे नाचलोंढी (प्रथम), विनता कांबडी हरसूल (द्वितीय), स्वाती कांबडी हरसूल (तृतीय)
४७ कि.मी.मुले : रामराव भोंबे नाचलोंढी (प्रथम), गणेश भोंबे नाचलोंढी (द्वितीय), धनाजी कसबे खंबाळे (तृतीय)