त्र्यंबकेश्वरला चौथ्या सोमवारसाठी सज्जता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 03:29 PM2018-09-01T15:29:05+5:302018-09-01T15:29:15+5:30
त्र्यंबकेश्वर : येत्या चौथ्या आणि श्रावणातील अंतिम सोमवारी त्र्यंबकेश्वरला गर्दी होण्याची शक्यता गृहित धरून येथे प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात येत आहे. तिसऱ्या श्रावणी सोमवारी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन असल्याने अनेकांना यावयास जमले नव्हते. त्यामुळे भाविक चौथ्या सोमवारी निश्चित येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. गत तिन्ही सोमवारी त्र्यंबकेश्वर नगरपरिषद पोलीस सेवा आरोग्य सेवा आदींनी जसे नियोजन केले होते तसेच ठेवले जाणार आहेत. कदाचित मनुष्यबळात थोडा फार फरक पडु शकतो. शेवटच्या सोमवारी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात शासकीय यंत्रणांना गर्दी होईल असे गृहीत धरूनच नियोजन करावे लागणार आहे. कारण पहिल्याच सोमवारी मंदीरात प्रचंड गर्दी होउन पुर्व बाजुकडील दर्शन बारी ओसंडुन बाहेरही रांगा लागल्या होत्या. यावेळेस देखील तसे होण्याची शक्यता आहे. यावेळेस शक्यतो परिक्र मेसाठी भाविक कमी जातील पण दर्शनाला महत्व देतील. त्यादृष्टीने मंदीर प्रशासनाची तयारी आहे. कितीही दर्शनार्थी आले तरी दर्शन सुलभ होईल याबाबत विश्वस्त मंडळ दक्ष आहे. देवस्थानचे अध्यक्ष न्या.बोधनकर तसेच विश्वस्त दिलीप तुंगार , प्रशांत गायधनी, अॅड. संतोष दिघे , अॅड.पंकज भुतडा, संतोष कदम व तृप्ती धारणे आदी उपस्थित होते.
यावेळेस देखील नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार, गटनेते समीर पाटणकर, यात्रा सभापती विष्णु दोबाडे , मुख्याधिकारी डॉ. चेतना मानुरे केरु रे आदी नियोजनावर लक्ष ठेवून आहेत. पोलीस प्रशासनाने देखील मागच्या तीनही बंदोबस्ताप्रमाणेच या शेवटच्या आणि अंतिम सोमवारी तयारी केली आहे. असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे सोनवे यांनी सांगितले. यापुर्वीचे तीनही श्रावण समवार शांतेतेत पार पडले. तसा हाही सोमवार शांततेत व निर्विघ्न पार पडेल अशी अपेक्षा आहे. यावेळी पोउनि सुरेश चौधरी, कैलास आकुले किरण मेहेर आदी अधिकारी उपस्थित होते.