त्र्यंबकेश्वर, सिन्नरच्या राष्ट्रवादी-मनसे नेत्यांनी बांधले ‘शिवबंधन’

By admin | Published: June 14, 2016 11:24 PM2016-06-14T23:24:06+5:302016-06-14T23:37:35+5:30

उदय सांगळेंसह अनेकांचा प्रवेश : उद्धव ठाकरे यांची उपस्थिती

Trimbakeshwar, Sinnar's NCP-MNS leaders built 'Shivbandhana' | त्र्यंबकेश्वर, सिन्नरच्या राष्ट्रवादी-मनसे नेत्यांनी बांधले ‘शिवबंधन’

त्र्यंबकेश्वर, सिन्नरच्या राष्ट्रवादी-मनसे नेत्यांनी बांधले ‘शिवबंधन’

Next

 नाशिक/ सिन्नर : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत इनकमिंग सुरूच असून, मंगळवारी (दि.१४) मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सिन्नर व त्र्यंबकेश्वरमधील पंचायत समिती सदस्य, नगरसेवक व तालुकाप्रमुखांसह सरपंचांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.
मंगळवारी यासंदर्भात शिवसेना प्रवेशाकडे अनेकांंचे लक्ष लागले होते. त्र्यंबकेश्वर मनसे तालुकाप्रमुख नामदेव चव्हाण, वाहतूक सेना तालुकाप्रमुख समाधान अहेर, माजी जि. प. सदस्य कमळू कडाळी, माजी जि. प. सभापती देवराम भस्मे, भास्कर धोेंगडे, नामदेव बेंडकोळी, गोविंद चव्हाण, काशीनाथ वरघडे, मुळेगाव सरपंच नामदेव सराई, मोहन बोडके, संजय निकम, शिवाजी अहेर, निवृत्ती चव्हाण, पंडित चव्हाण, पोपटराव देशमुख, रमेश महाले, गोपाल शिंदे, रामदास भगत, अशोक चव्हाण, गंगाराम बोडके, रवि मुर्तडक, राम धोेंडगे या मनसे पदाधिकाऱ्यांनी, तसेच सिन्नर पंचायत समितीतील राष्ट्रवादीचे गटनेते उदय सांगळे यांच्यासह पंचायत समिती सदस्य प्रकाश कदम, वसंत उघडे, अलका पवार, सविता पवार, सोनाली कर्डक, नीलेश केदार आणि कॉँग्रेसचे सदस्य हरिदास लोहकरे व छाया दळवी, सिन्नर नगरपालिकेतील नगरसेवक विजय जाधव, शैलेश नाईक, मनोज भगत, राजेंद्र घोरपडे, प्रमोद चोथवे, वैजयंती बर्डे, शुभांगीताई झगडे, पुष्पलता लोणारे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. तसेच नाशिकरोड येथील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या काही विभागीय अध्यक्ष, शाखाध्यक्षांनीही शिवबंधन बांधले. याप्रसंगी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार हेमंत गोडसे, संपर्कप्रमुख अजय चौधरी, राज्यमंत्री दादा भुसे, माजीमंत्री बबनराव घोलप, आमदार योगेश घोलप, आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुहास कांदे, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, पंचायत समिती उपसभापती अनिल ढिकले, राजू लवटे, सत्यभामा गाडेकर, केशव पोरजे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Trimbakeshwar, Sinnar's NCP-MNS leaders built 'Shivbandhana'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.