उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ त्र्यंबकेश्वर घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2022 11:52 PM2022-06-25T23:52:28+5:302022-06-25T23:52:56+5:30

त्र्यंबकेश्वर : उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असल्याचा विश्वास त्र्यंबकेश्वर तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने घोषणाबाजी करून देण्यात आला. नुकत्याच झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहरासह तालुका शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी शनिवारी (दि.२५) डॉ. आंबेडकर चौकात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणा देत समर्थन व्यक्त केले.

Trimbakeshwar sloganeering in support of Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ त्र्यंबकेश्वर घोषणाबाजी

उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ त्र्यंबकेश्वर घोषणाबाजी

Next
ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर तालुका उद्धव ठाकरे यांच्या बाजूने एकवटला असल्याचे सांगण्यत आले.

त्र्यंबकेश्वर : उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असल्याचा विश्वास त्र्यंबकेश्वर तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने घोषणाबाजी करून देण्यात आला. नुकत्याच झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहरासह तालुका शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी शनिवारी (दि.२५) डॉ. आंबेडकर चौकात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणा देत समर्थन व्यक्त केले.

शिवसेनेचे ४२ आमदार, विद्यमान नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करून थेट गुवाहाटी येथे निघून गेले आणि सरकार कोसळण्याची भीती निर्माण झाली. या सर्व घडामोडीत शिवसेनेवर हा मोठा आघात होता. अशा परिस्थितीत त्र्यंबकेश्वर शहर व तालुका शिवसेनेतर्फे आंदोलन करून संपूर्ण त्र्यंबकेश्वर तालुका उद्धव ठाकरे यांच्या बाजूने एकवटला असल्याचे सांगण्यत आले.
यावेळी तालुका प्रमुख संपत चव्हाण, रवी वारुणसे, रामनाथ बोडके, नंदकुमार कदम, दीपक लोखंडे, कल्पेश कदम, शहरप्रमुख सचिन दीक्षित, नितीन पवार, बाळा गाजरे, सचिन कदम, नगरसेविका कल्पना लहांगे, मंगला आराधी आदी उपस्थित होते. (२५ त्र्यंबक)

Web Title: Trimbakeshwar sloganeering in support of Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.