त्र्यंबकेश्वर तालुक्यात मुसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 11:10 PM2018-06-25T23:10:01+5:302018-06-25T23:12:37+5:30

त्र्यंबकेश्वर : गेल्या महिनाभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर शहरात हजेरी लावली. सोमवारी (दि. २५) दिवसभर संततधार होती. रविवारी (दि.२४) सायंकाळी साडेपाच वाजेपासून सोमवारी सकाळी झालेल्या २४ तासांत एकूण ४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ३२ मिमी व सोमवारी झालेला ४१ मिमी असा एकूण ७३ मिमी पाऊस जून महिन्याच्या उत्तरार्धात झाला आहे. आजही पावसाचे सातत्य आहे. शेतकामांना वेग आला आहे.

In Trimbakeshwar taluka, the Mussaladhar | त्र्यंबकेश्वर तालुक्यात मुसळधार

त्र्यंबकेश्वर तालुक्यात मुसळधार

Next
ठळक मुद्देशेतकामांना वेग दोन दिवसात ४१ मिमी पावसाची नोंद

त्र्यंबकेश्वर : गेल्या महिनाभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर शहरात हजेरी लावली. सोमवारी (दि. २५) दिवसभर संततधार होती. रविवारी (दि.२४) सायंकाळी साडेपाच वाजेपासून सोमवारी सकाळी झालेल्या २४ तासांत एकूण ४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ३२ मिमी व सोमवारी झालेला ४१ मिमी असा एकूण ७३ मिमी पाऊस जून महिन्याच्या उत्तरार्धात झाला आहे. आजही पावसाचे सातत्य आहे. शेतकामांना वेग आला आहे.
तालुक्यात रोहिणी नक्षत्राने एकदाही हजेरी लावली नाही, तर मृग नक्षत्र संपूर्ण कोरडे गेले. रविवारपासून मात्र पावसाने सातत्य राखले आहे. पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांना लागवडीसाठी आता पैशांची आवश्यकता भासू लागल्याने राष्ट्रीय बँकांमध्ये शेतकºयांच्या चकरा सुरू झाल्या आहेत. अनेक शेतकºयांनी पेरणीची प्राथमिक कामे पूर्ण करण्यास वेग दिला आहे. काहींनी अगोदर पेरणी केल्याने त्यांच्या भाताची रोपे सहा इंचांपेक्षा मोठी झाली आहेत. असाच पाऊस राहिल्यास शेतकरी पुढील आठवड्यात आवणीदेखील आटोपतील.
सध्या पाऊस सुरू असल्याने लोकांच्या छत्र्या, रेनकोट आदी बाहेर येत आहेत. पावसापासून संरक्षण करणाºया वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात झुंबड उडाली आहे. प्रत्येक वर्षी नवनवीन प्रकारच्या छत्र्या, रेनकोट येत आहेत. त्यामुळे ग्राहक लगेच आकर्षित होत असतो.
तालुक्यात विविध जातीची भात बियाणे, खते आदी उपलब्ध आहेत. काही शेतकरी खास पेरणीसाठी बियाणे राखून ठेवतात. आवणीसाठी दरदिवशी अडीचशे ते तीनशे रुपये हजेरी आहे. याशिवाय औतकरी किंवा भाड्याने ट्रॅक्टर लावला तर त्याला तासाच्या हिशेबाने पैसे द्यावे लागतात. हल्ली बैलांच्या माध्यमाने औताने शेती नांगरण्याचा प्रकार मागे पडत चालला आहे. आता यांत्रिकी शेतीकडे शेतकºयांचा कल वाढला आहे. तरीही अनेकजण अजूनही बैलांच्या नांगरानेच शेती करतात. ट्रॅक्टर घ्यायची ऐपत असूनही काही शेतकºयांनी मुद्दाम बैल पदरी ठेवले आहेत.उमराळेनजीक पहिल्याच पावसात लालपरी घसरली पेठ : शहरासह तालुक्यात सोमवारी पहाटेपासून दमदार पाऊस सुरू असून, पहिल्याच पावसात रस्त्यांची वाट लागली आहे. पेठ-नाशिक रस्त्यावर बस घसरून अपघात झाल्याने याची प्रचिती आली. या अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. नाशिकहून सकाळी येणारी जनता बस (क्र . एमएच २० डी ९३४१) उमराळेजवळ नवीन रस्त्याचे काम सुरू असल्याने कच्च्या रस्त्यावरून जात असताना घसरली. यामुळे बसमधील प्रवासी एकमेकांवर जाऊन आदळल्याने किरकोळ जखमी झाले. सुदैवाने मोठी दुर्घटना झाली नाही. पहिल्याच पावसात तालुक्यातील बत्ती गुल झाल्याने तालुक्यात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. जीर्ण झालेले खांब व लोंबकळणाºया वीजवाहिन्या यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिसरात समाधानकारक पाऊस सुरू झाल्याने शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त झाला आहे. परिसरात भात व नागलीची पेरणी जोमात सुरू असून, पावसाने बळीराजा सुखावला आहे.

Web Title: In Trimbakeshwar taluka, the Mussaladhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक