भाविकांवाचून त्र्यंबकेश्वर मंदिर भकास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 09:27 PM2021-03-20T21:27:35+5:302021-03-21T00:45:40+5:30
त्र्यंबकेश्वर : शासनाच्या नवीन निर्बंधानुसार प्रत्येक शनिवार व रविवार त्र्यंबकेश्वर मंदिर पूर्णतः बंद ठेवले जात असून भाविकांना येथे मनाई करण्यात आल्याने त्र्यंबकेश्वर परिसर भाविकांविना सुना सुना झाला असून निर्बंधाने सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे.
त्र्यंबकेश्वर : शासनाच्या नवीन निर्बंधानुसार प्रत्येक शनिवार व रविवार त्र्यंबकेश्वरमंदिर पूर्णतः बंद ठेवले जात असून भाविकांना येथे मनाई करण्यात आल्याने त्र्यंबकेश्वर परिसर भाविकांविना सुना सुना झाला असून निर्बंधाने सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे.
मागील आठवड्यात ११ मार्चला महाशिवरात्री यात्रा बंद करण्यात आली होती. मंदिरात गर्दी होऊ नये म्हणून सलग चार दिवस बंद करण्यात आले होते. दि.११ मार्च ते १२ मार्च महाशिवरात्री व त्याच दिवसापासून सलग दोन दिवस शनिवार व रविवार मंदिर बंद ठेवण्यात आले, त्यामुळे मागील आठवड्यात सलग चार दिवस मंदिर बंद होते. शनिवार, रविवार मंदिर बंद असल्याने हा परिसर ओस पडलेला दिसतो. हॉटेल्स, किराणा, फुलविक्रेते नसल्याने हा परिसर भकास वाटू लागला आहे. सोमवार ते शुक्रवार मंदिर खुले असल्याने भाविक दर्शन घेऊन जातात.