त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 11:57 PM2020-03-18T23:57:25+5:302020-03-18T23:59:18+5:30

त्र्यंबकेश्वर : बारा ज्योतिलर््िंागांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर बुधवारपासून (दि.१८) पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्यांच्या कालावधीत होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर दर्शनार्थींकरिता बंद ठेवण्यात आले आहे. गर्दी होता कामा नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.

Trimbakeshwar temple closed for devotees! | त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद!

त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद!

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाचा परिणाम : रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास; दर्शनास मनाई

लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : बारा ज्योतिलर््िंागांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर बुधवारपासून (दि.१८) पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्यांच्या कालावधीत होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर दर्शनार्थींकरिता बंद ठेवण्यात आले आहे. गर्दी होता कामा नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने बैठकी बोलावली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान त्र्यंबकराजाच्या नित्य पूजा सुरू राहील, अशी माहिती देण्यात आली आहे. बैठकीला नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी, मुख्य अधिकारी निकम, लॉजिंग व हॉटेल व्यावसायिक, देवस्थानचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील नारायण नागबली, कालसर्प शांती, त्रिपिंडी श्राद्ध आदी धार्मिक विधींचे बुकिंग रद्द करण्यात आले आहे.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून येथील सर्वच मंदिरांमध्ये बुधवारपासून (दि. १८) दर्शन बंद करण्यात आले आहे. गर्दीने गजबजलेल्या मंदिरांमध्ये शुकशुकाट पसरला आहे, तर रस्ते ओस पडले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत भाविकांनी येथे न येण्याचे आवाहन मंदिरांच्या विश्वस्त मंडळाने केले आहे. विशेष म्हणजे येथील संत निवृत्तिनाथ समाधी मंदिरातही बुधवारपासून दर्शनबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. समाधी संस्थानचे अध्यक्ष पवनकुमार भुतडा हे मुंबई येथे गेल्याने बैठकीचे अध्यक्ष जयंत गोसावी होते.
त्र्यंबकेश्वर मंदिर, संत निवृत्तिनाथ समाधी मंदिर, श्री स्वामी समर्थ आश्रम, श्री गजानन महाराज संस्थान आदी धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद करण्यात आले आहेत. हरिहर गडावर येण्यास तर पर्यटकांना बंदी करण्यात आली आहे. गडाचे प्रवेशस्वार यापूर्वीच बंद करण्यात आले आहे. बुधवारी येथील संत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानची तातडीची बैठक होऊन राष्ट्रीय आपत्ती निवारणाच्या निमित्ताने भाविकांनी गर्दी करू नये म्हणून दर्शनबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीसाठी ज्येष्ठ विश्वस्त त्र्यंबक गायकवाड, पुंडलिक थेटे, योगेश गोसावी, मधुकर लांडे, व्यवस्थापक गंगाराम झोले आदी उपस्थित होते. तसेच शहरातील धार्मिक गर्दीची ठिकाणे गजानन महाराज ट्रस्ट व श्री स्वामी समर्थ मंदिर व आश्रमदेखील भाविकांसाठी बंद करण्यात आले आहेत. दर्शनबंदीमुळे त्र्यंबकेश्वरची आर्थिक घडी विस्कटली आहे. सतीदेवी, सामतदादा देवस्थान दर्शनासाठी बंदनाशिक : सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथील सतीदेवी, सामतदादा देवस्थान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आल्याची माहिती विश्वस्त मंडळाने दिली आहे. याबाबतचा निर्णय बुधवारी (दि.१८) घेण्यात आला. राज्यातील बंजारा समाजबांधवांचे श्रद्धास्थान म्हणून सतीदेवी व सामतदादा देवस्थान ओळखले जाते. सध्या कोरोना व्हायरसचे सुरू असलेले थैमान पाहता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या आदेशान्वये धार्मिकस्थळांवर भाविकांना बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार देवस्थानावरही भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन विश्वस्त मंडळाचे अशोक चव्हाण, रमेश खुळे, अरुण चव्हाण, दीपक खुळे, शरद खुळे आदींनी केले आहे.

Web Title: Trimbakeshwar temple closed for devotees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.