त्र्यंबकेश्वर : प्रदक्षिणेसाठी जाणाºया भाविकांनी त्र्यंबकेश्वर गजबजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 12:02 AM2017-08-07T00:02:45+5:302017-08-07T00:08:53+5:30

तिसºयाश्रावण सोमवारच्या पाशर््वभूमीवर श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शिवस्वरु प ब्रह्मिगरी प्रदक्षिणा साठी येणाºयाभाविकांनी त्र्यंबकेश्वर शहर गजबजुन गेले आहे. त्र्यंबकेश्वर व परिसरातील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी वाहनांचे पास देऊनसुद्धा पोलीस पासधारकांची अडवणूक करीत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

Trimbakeshwar: Trimbakeshwar Gajbajale, who went to Pradakshina | त्र्यंबकेश्वर : प्रदक्षिणेसाठी जाणाºया भाविकांनी त्र्यंबकेश्वर गजबजले

त्र्यंबकेश्वर : प्रदक्षिणेसाठी जाणाºया भाविकांनी त्र्यंबकेश्वर गजबजले

Next

त्र्यंबकेश्वर : तिसºयाश्रावण सोमवारच्या पाशर््वभूमीवर श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शिवस्वरु प ब्रह्मिगरी प्रदक्षिणा साठी येणाºयाभाविकांनी त्र्यंबकेश्वर शहर गजबजुन गेले आहे. त्र्यंबकेश्वर व परिसरातील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी वाहनांचे पास देऊनसुद्धा पोलीस पासधारकांची अडवणूक करीत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
त्र्यंबकेश्वरला रविवारी येण्याचा उद्देश म्हणजे दिवसभर दर्शन, तर एखाद्या पहाडावर जाऊन यावे असा विचार करु न रात्रीच प्रदक्षिणेला जाता येईल या उद्देशाने आज रात्रीपर्यंत त्र्यंबकेश्वर गजबजले होते. खंबाळे पार्किंगवर रविवारपासुनच पार्कींगवर वाहने अडविण्यात येत आहेत. त्यामुळे नित्य येणारे परिसरातील स्थानिक नागरिक ,पोलीस यांचे खटके उडतांना दिसत आहे. तर काही पोलीस अधिकारी व कर्मचाची वाहनांना पास असुन देखील वाहने सोडीत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. बंदोबस्तासाठी आलेले पोलीस अधिकारी अधिकृ तपास नाकारतात. मग स्थानिकांनी वाहन खंबाळे तळवाडे पहिने किंवा अंबोलीला लावायचे काय ? यामुळे यात्रेच फटका स्थानिकांना बसलाआहे.
जव्हार फाटा महादेवी नाका बाजार समिती जवळील जुना जव्हार फाटा डॉ. आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी चौक कुशावर्त तिर्थ तेली गल्ली आदी ठिकाणी बॅरीकेड्स लाऊन वाहनांना बंदी करण्यात आली आहे.तसच वरील प्रत्येक पॉइंटवर कडक बंदोबस्त लावला आहे. प्रदक्षिणा मार्गावर पोलीस फोर्स तैनात करण्यात आला आहे. सोमवारी येणाºया प्रदक्षिणार्थींना मोफत रित्या फराळ चहा आदी सेवाभावी संस्थांचे व्यक्तिंचे प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. वनविभागाने प्रदक्षिणा मार्गावर आपलेही कर्मचारी नेमले असुन प्रदुषण होऊ नये यासाठी प्रयत्न करतील. विद्युत विभागाने विजपुरवठा खंडीत होऊ नये यासाठी कर्मचारी नियुक्त केले आहेत. सहा. उप अभियंता किशोर सरनाईक दोन दिवसांपासुन त्र्यंबकेश्वरलाच आहेत. नगराध्यक्ष तृप्ती धारणे मुख्याधिकारी डॉ. चेतना मानुरे केरु रे या दोन्हीही महिला पदाधिकारी अधिकारी विशेष लक्ष देत आहेत. पोलीसांनी सध्यातरी उत्तम नियोजन व बंदोबस्त लावला असुन सोमवारचे नियोजन व्यविस्थत व्हावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. उगीच बंदोबस्ताचा बाऊ नको. शक्यतो स्थानिकांना अडवु नये. संपुर्ण पोलीस बंदोबस्त जिल्हा पोलीस अधिक्षक (ग्रामिण) डॉ. संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस डी वाय एस पी श्यामराव वळवी स्थानिक पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी आदींनी ठेवला आहे. एकुणच तिसर्या श्रावणी सोमवारची सर्व तयारी प्रशासन यंत्रणांनी केली आहे.

 

Web Title: Trimbakeshwar: Trimbakeshwar Gajbajale, who went to Pradakshina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.