त्र्यंबकेश्वरला उटीची वारी अर्थात वरु थिनी एकादशी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 07:55 PM2019-04-30T19:55:21+5:302019-04-30T19:56:40+5:30
त्र्यंबकेश्वर : आज दुपारी दोन वाजता संत निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीला थंडगार सुवासिक चंदनाच्या उटीचा व विविध सुवासिक आयुर्वेदिक वनौषधींचा लेप चढविण्यात आला. तर उन्हाचा दाह या लेपानंतर शांत झाल्यानंतर रात्री बारानंतर तिच उटी उतरवली जाते. ती अंगावर पडल्यानंतर तच उटीचा प्रसाद होय.
त्र्यंबकेश्वर : आज दुपारी दोन वाजता संत निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीला थंडगार सुवासिक चंदनाच्या उटीचा व विविध सुवासिक आयुर्वेदिक वनौषधींचा लेप चढविण्यात आला. तर उन्हाचा दाह या लेपानंतर शांत झाल्यानंतर रात्री बारानंतर तिच उटी उतरवली जाते. ती अंगावर पडल्यानंतर तच उटीचा प्रसाद होय.
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीला सुगंधी चंदनाच्या उटीसह विविध सुगंधी व थंडगार आयुर्वेदिक वनस्पतींचा चंदनाच्या उटीचा लेप लावण्यासाठी वरु थिनी एकादशीच्या दिवशी लेप चढवितात. त्यालाच उटीची वारी असे म्हणतात.
ऐन वैशाखाच्या रणरणत्या उन्हाचा दाह दरवर्षी वाढत असतो. उन्हाच्या या उष्णतेचा त्रास चराचरातील पशुपक्षांना जाणवत असतो. संत श्रीनिवृत्तीनाथ महाराजांनी तर सातशे वर्षांपुर्वी संजीवन समाधी घेतली होती. साहजिकच उन्हाच्या उष्णतेचा प्रभाव संजीवन समाधीला न बसेल तर नवलच ! उन्हाचा दाहच्या झळा संजीवन समाधीला बसत असतील या श्रध्देने वारकरी सांप्रदायिक स:त निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीला हा थंडगार आयुर्वेदिक व सुगधी गुणधर्म असलेल्या चंदनाच्या उटीसह अन्य सुगंधी वनस्पतींचा लेप सुमारे १२ तास चढविला जातो.
यासाठी चैत्र कृ.पंचमी पासुनच सुगंधी चंदनाची खोडं उगाळण्यास सुरवात होत असते. त्यासाठी महिला पुरु ष विशेषत: महिला वर्ग अभंग म्हणत सहाणेवर उटी उगाळतात. त्यात सुगंधी वनौषधी द्रव्य घालुन तो लेप उटीच्या स्वरु पात मंगळवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान उटी चढविण्यास प्रारंभ होतो. रात्री १२ वाजेपर्यंत उटीचा लेप समाधीवर असतो. नंतर मात्र उतरविला जातो. तोपर्यंत रात्रीचे एक दिड वाजतात.
रात्री बारा वाजता उटी उतरविण्यास प्रारंभ होतो. आणि उतरविलेली उटी उपस्थित वारकऱ्यांच्या अंगावर शिंपडली जाते. तोच प्रसाद म्हणुन भाविकांना दिला जातो. उटीच्या वारीसाठी हजारो वारकरी त्र्यंबकेश्वर येथे येत असतात. नाशिक जिल्ह्यातुन अनेक दिंड्या टाळ मृदंगाच्या गजरात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरला येथे येत असतात. सर्वत्र हरीनामाचा जयघोष सुरु असतो. उटीच्या वारीला मिनी निवत्तीनाथ यात्रा असेही म्हणतात.
निवृत्तीनाथ समाधी परिसरात जत्रा भरलेली असून तेथे हॉटेल्स दुकाने खजुर पेढे केळी पेरु उसाचा रस आदींची दुकाने लावलेली आहेत.
या वारीसाठी श्रीनिवृत्तीनाथ समाधी संस्थानचे विश्वस्त मंडळ सज्ज झाले असुन अध्यक्ष पंडीतराव कोल्हे, सचिव जिजाबाई लांडे, पालखी प्रमुख पुंडलिक थेटे, त्र्यंबकराव गायकवाड, संजय धोंडगे, पवन भुतडा, रामभाऊ मुळाणे, डॉ.धनश्री हरदास, ललिता शिंदे, जयंत गोसावी, अविनाश गोसावी, योगेश गोसावी आदी प्रयत्नशील आहे.
दरम्यान संत निवृत्तीनाथ मंदीर परिसरात चौकीमाथा येथील ठाकुर विहीरी समोरील श्रीहनुमान मंदीर येथे श्रीहनुमानाची यात्रा भरलेली आहे. त्यामुळे उटीच्या वारीबरोबर श्रीहनुमान यात्रा असल्याने गर्दीत भरच पडत आहे.