त्र्यंबकेश्वरला उलट्या-जुलाबाची साथ

By admin | Published: December 3, 2015 10:00 PM2015-12-03T22:00:39+5:302015-12-03T22:01:32+5:30

दखल : उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण दाखल

Trimbakeshwar with Vomiting-Zulabchi | त्र्यंबकेश्वरला उलट्या-जुलाबाची साथ

त्र्यंबकेश्वरला उलट्या-जुलाबाची साथ

Next

त्र्यंबकेश्वर : गेल्या ५/६ दिवसांपासून त्र्यंबकेश्वर शहरात उलट्या व जुलाबाची साथ पसरली असून, येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण दाखल होत आहेत. सिंहस्थ संपून जवळपास तीन महिने होत आले आहेत. तथापि भाविकांना व शहरवासीयांना कोणताही आजाराचा फटका बसला नाही. सिंहस्थातील तीनही पर्वण्या सुखरूप पार पडल्या.
शहरात गेल्या ५ ते ६ दिवसांपासून पोटात मुरडा मारून येणे, मळमळ होऊन उलट्या होेणे, जुलाब होणे असे आजार घरोघरी पसरले आहे.
पालिकेने पाण्याच्या जलशयाचीही पाहणी केली. पाण्यात काही जनावरे मरून पडली आहे किंवा काय अशा सर्व शक्यता पडताळूृन पाहिल्या. याबाबत आम्ही पुरेपूर काळजी घेत असल्याचे मुख्याधिकारी नागरे यांनी सांगितले. उपजिल्हा रुग्णालयातदेखील रुग्ण दाखल होऊन उपचार करून जात आहेत. गावातील खासगी रुग्णालयातदेखील नागरिक उपचार करून जात आहेत. बुधवारी रुग्णांचे प्रमाण जास्त होते, आज थोडे कमी असल्याचे डॉ. पंकज बोरसे यांनी सांगितले. उपजिल्हा रुग्णालयानेदेखील घरोघरी सर्वेक्षण करून बाधीत रुग्णांना गोळ्या, औषधे देणे सुरू केले आहे, तर गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची तजवीज केली आहे, अशी माहिती डॉ. अशोक माने, डॉ. भागवत लोंढे व डॉ. विठ्ठल काळे यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: Trimbakeshwar with Vomiting-Zulabchi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.