त्र्यंबकेश्वरला डासांचा उपद्रव वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 10:53 PM2020-09-09T22:53:19+5:302020-09-10T01:14:00+5:30
त्र्यंबकेश्वर : एकीकडे कोरोनाची भीती व दुसरीकडे डासांनी मांडलेला उच्छाद पाहता झालेला थंडी ताप खोकला हा व्हायरल थंडीताप आहे की कोरोना यामुळे शहरवासीय हैराण झाले आहेत. पालिकेने शहरात अस्वच्छता मोहीम राबवून डासांचा उपद्रव थांबविण्याची मागनी नागरिकांनी केली आहे.

डासांमुळेही थंडीताप खोकला येतो. तर कोरोना कोव्हीड -19 ची लक्षणे देखील थंडी ताप खोकला हीच आहेत. परिणामी सर्वसाधारण लोक संभ्रमावस्थेत असतात. सध्या डासांचा एवढा उपद्रव वाढला असताना नगर परिषद मार डोळे बंद करु न बसली आहे. वास्तविक गावात कोरोनाचे रुग्ण असताना शहरात कीटकनाशक व जंतुनाशक फवारणी करणे हे पालिकेचे कर्तव्य आहे. मात्र, ते पार पाडताना प्रशासन दिसत नसल्याने नगरपालिकेला लोकांच्या आरोग्याची काहीच काळजी नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.