त्र्यंबकेश्वरला पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 09:32 PM2020-05-27T21:32:48+5:302020-05-27T23:49:03+5:30

त्र्यंबकेश्वर : शहरासह तालुक्यात पाणीटंचाई सुरू झाली आहे. एकट्या त्र्यंबकेश्वर शहराला नगर परिषदेतर्फे तीन जलाशयातून पाणीपुरवठा होत असतो. तथापि या तीनही जलाशयांचा साठा आटल्याने त्र्यंबककवासीयांना दिवसाआड पाणी पिण्याची वेळ आली आहे. शहराला यावर्षी उशिराने पाणीटंचाई सुरू झाली.

Trimbakeshwar water scarcity | त्र्यंबकेश्वरला पाणीटंचाई

त्र्यंबकेश्वरला पाणीटंचाई

Next

त्र्यंबकेश्वर : शहरासह तालुक्यात पाणीटंचाई सुरू झाली आहे. एकट्या त्र्यंबकेश्वर शहराला नगर परिषदेतर्फे तीन जलाशयातून पाणीपुरवठा होत असतो. तथापि या तीनही जलाशयांचा साठा आटल्याने त्र्यंबककवासीयांना दिवसाआड पाणी पिण्याची वेळ आली आहे.
शहराला यावर्षी उशिराने पाणीटंचाई सुरू झाली. सन २०१९ मध्ये पावसाचे प्रमाण वाढल्याने यावर्षी टंचाई उशिराने सुरू झाली. अर्थात त्र्यंबकेश्वर शहराला टंचाई परिस्थिती भासण्याची तशी काही गरज नाही. त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यास ३/४ वर्षांचा अवधी राहिल्यास सिंहस्थ नियोजनाची कामे सुरू केली जातात. त्यात सर्व प्रथम पाण्याला प्राधान्य दिले जाते.
गेल्या ३६ वर्षांत तीन वेळा त्र्यंबकच्या पाणीपुरवठा योजना शासनातर्फे तयार केल्या गेल्या. १९९०-९१ साली अंबोली लघुपाटबंधारे धरणातून त्र्यंबकेश्वरला थेट पाइपलाइनद्वारे ११ किलोमीटर अंतरावरून योजना तयार करण्यात आली. सन २००३-०४ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यात अंबोली सुधारित योजना अंमलात आली. यात अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जलवाहिनी करत योजना तयार करण्यात आली होती. सन २०१५-१६ साली गौतमी गोदावरी प्रकल्प अंमलात आणला गेला. गौतमी गोदा धरणातून त्र्यंबकेश्वरसाठी फक्त १० टक्के पाणी राखीव आहे. बेझे धरण मुळातच मराठवाडा विभागासाठी असल्याने ऐन उन्हाळ्यात व त्यापूर्वीदेखील मराठवाडा विभागाकडे विसर्ग केला जातो. साहजिकच बेझे धरणात त्र्यंबकसाठी आरक्षित असलेले १० टक्के पाणी मिळणे अशक्य असते.
----------------

 त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मालकीचे अहिल्या धरण, अंबोली धरण व बेझे धरण अशा तीनही धरणात पाण्याचा साठा आटल्याने त्र्यंबकेश्वरसाठी दिवसाआड पाणीपुरवठ्याचा पर्याय पालिकेने जाहीर केला आहे. यात दोन झोनमध्ये अवघे ४० मिनिटे पाणी सोडले जाणार आहे.

 

Web Title: Trimbakeshwar water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक