त्र्यंबकेश्वरला दहा दिवस बंद पाळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 01:35 PM2020-06-26T13:35:22+5:302020-06-26T13:35:42+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसुल येथे नव्याने दोन तर शहरात एक कोरोनाचा रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने ग्रामस्थांनी दहा दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेतला असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसुल येथे नव्याने दोन तर शहरात एक कोरोनाचा रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने ग्रामस्थांनी दहा दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेतला असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
शहरात एक हार्डवेअर व अन्य सामानाचे विक्र ेते गेल्या काही दिवसांपासुन नाशिक येथे अॅडमिट होते. त्यांचा स्वॅब अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्या घरातील सात जणांना ब्रम्हाव्हॅली येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्या सर्वांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तहसिलदार कार्यालयात त्र्यंबक तालुक्या संदर्भात हरसुल व त्र्यंबकेश्वर येथे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने आमदार हिरामण खोसकर, तहसिलदार दीपक गिरासे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, मुख्याधिकारी डॉ प्रवीण निकम, सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे आदींची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत रु ग्ण जेथे राहतो त्या संपुर्ण परिसरापासुन सुमारे १५० मीटरपर्यंत कन्टेन्मेन्ट झोन प्रतिबंधित करावा. हरसुल व त्र्यंबकेश्वर येथील रु ग्णांच्या परिसरातील रहिवासी व त्यांच्या संपर्कातील नागरिकांची माहिती संकलित करणे, त्यांना क्वारंटाईन करणे, या परिसरातील संपुर्ण घराघरांमध्ये जंतुनाशक फवारणी करणे, स्वच्छता ठेवणे या बरोबरच बाहेरून येणाऱ्यांच्या नोंदी ठेवणे आदी जबाबदारी त्र्यंबक नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक हिरामण ठाकरे यांच्यावर नोडल आॅफीसर म्हणुन जबाबदारी सोपविण्यात आली आहे.