‘त्या’ दोघा महंतांना त्र्यंबकेश्वरी समाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 11:25 PM2020-04-20T23:25:41+5:302020-04-20T23:26:01+5:30

श्री मौनीबाबा मठाचे कल्पवृक्षगिरी तथा चिकनाअघोरी महाराज (७०) आणि त्यांचे कांदिवलीस्थित शिष्य सुशीलगिरी महाराज (३०) यांच्यासह त्यांचे वाहनचालक नीलेश तेलवडे (३०) ह्या तिघांची जमावाकडून निर्घृण हत्या झाल्यानंतर दोघा महंतांना आखाड्याच्या नियमानुसार रविवारी (दि.१९) रात्री उशिरा समाधिस्त करण्यात आले. दरम्यान, या घटनेचा साधू-महंतांनी तीव्र निषेध केला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Trimbakeshwari Samadhi to 'those' two mahants | ‘त्या’ दोघा महंतांना त्र्यंबकेश्वरी समाधी

‘त्या’ दोघा महंतांना त्र्यंबकेश्वरी समाधी

Next
ठळक मुद्देहत्येचे तीव्र पडसाद : कारवाईची मागणी

त्र्यंबकेश्वर : येथील श्री मौनीबाबा मठाचे कल्पवृक्षगिरी तथा चिकनाअघोरी महाराज (७०) आणि त्यांचे कांदिवलीस्थित शिष्य सुशीलगिरी महाराज (३०) यांच्यासह त्यांचे वाहनचालक नीलेश तेलवडे (३०) ह्या तिघांची जमावाकडून निर्घृण हत्या झाल्यानंतर दोघा महंतांना आखाड्याच्या नियमानुसार रविवारी (दि.१९) रात्री उशिरा समाधिस्त करण्यात आले. दरम्यान, या घटनेचा साधू-महंतांनी तीव्र निषेध केला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
त्र्यंबकेश्वर येथील कल्पवृक्षगिरी, सुशीलगिरी आणि नीलेश तेलवडे हे तिघे महाराजांच्या शिष्याच्या अंत्यविधीसाठी सुरत येथे जात असताना डहाणू तालुक्यातील कासाजवळील गडचिंचले गावातील सुमारे २०० ते २५०च्या संख्येने जमलेल्या जमावाने चोर असल्याच्या अफवेतून लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत या तिघांना ठार मारले. या घटनेचे तीव्र पडसाद त्र्यंबकेश्वरसह देशभर उमटले. दरम्यान, रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास कल्पवृक्षगिरी महाराज व सुशीलगिरी महाराज यांना श्री पंचायती दशनाम जुना तथा भैरव आखाड्याचे ठाणापती महंत विष्णुगिरी महाराज व महंत सहजानंदगिरी महाराज याच्या मार्गदर्शनाखाली आखाड्याच्या नियमानुसार समाधिस्थ करण्यात आले, तर चालक नीलेश तेलवडे यांच्या पार्थिवावर कांदिवली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
महंत कल्पवृक्षगिरी हे जुना आखाड्याशी संबंधित असल्याने त्यांना समाधी देऊन अंत्यविधी करण्यात आला. पुढील सोपस्कार आखाडा ठरविल त्याप्रमाणे त्यांचे शिष्य किंवा उत्तराधिकारी कोणी असल्यास त्यांना महंत कल्पवृक्षगिरी महाराज यांच्या गादीवर बसविले जाईल. हा सोहळा सोळशीच्या दिवशी होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, समाधिप्रसंगी दहा पंचायती आखाड्याचे व गोरक्षनाथ मठाचे संत महात्मा सोशल डिस्टिन्संगच्या कारणामुळे एकत्र जमा झाले नाही.

...तर नागा साधूंचा मुख्यमंत्र्यांना घेराव
या हत्या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे. जर कारवाई होणार नसेल तर नागा साधू घेऊन मुख्यमंत्र्यांना घेराव घातला जाईल. प्रसंगी त्या गावातही नागा साधू जाऊन पोहोचतील. या निंदनीय घटनेचा मी निषेध करतो. असे वाराणसीस्थित अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत नरेंद्रगिरी महाराज यांनी म्हटले आहे.

या दुर्दैवी घटनेची चौकशी होणे गरजेचे आहे. ही हत्या अत्यंत निर्घृणपणे झाली असून, साधू-महात्मा पोलिसांच्या आधाराने जात असताना पोलिसाने आपला हात सोडवून घेतला ही बाब योग्य नसल्याचे सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व गुन्हेगारांना कठोर शासन झाले पाहिजे.
- श्री स्वामी सागरानंद सरस्वती, अध्यक्ष, त्र्यंबकेश्वर षड्दर्शन अखाडा परिषद

Web Title: Trimbakeshwari Samadhi to 'those' two mahants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.