त्र्यंबकेश्वरची उटीची वारी यंदाही रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 12:24 AM2021-05-04T00:24:01+5:302021-05-04T00:25:38+5:30

नाशिक : येत्या शुक्रवारी (दि.७) वरुथिनी एकादशीला होणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या उटीच्या वारीला सलग दुसऱ्या वर्षीही भाविक वारकऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना या वारीलाही मुकावे लागणार आहे.

Trimbakeshwar's Ooty Wari canceled this year too | त्र्यंबकेश्वरची उटीची वारी यंदाही रद्द

त्र्यंबकेश्वरची उटीची वारी यंदाही रद्द

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाचा कहर : मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत होणार विधी

नाशिक : येत्या शुक्रवारी (दि.७) वरुथिनी एकादशीला होणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या उटीच्या वारीला सलग दुसऱ्या वर्षीही भाविक वारकऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना या वारीलाही मुकावे लागणार आहे.

उटीची वारी म्हणजे श्रीसंतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची 'मिनी निवृत्तीनाथ यात्रा' मानली जाते. मे महिन्यातील उन्हाच्या तीव्रतेपासून मनुष्यासह पशू-पक्ष्यांना उन्हाचा दाह सहन होत नाही. संत निवृत्तीनाथ महाराज यांनी ७२४ वर्षांपूर्वी आपले अवतारकार्य संपवीत त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली. तथापि, आजही श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांचा आत्मा संजीवन समाधीच्या गुहेत वास करीत असल्याच्या श्रद्धा भावनेतून दरवर्षी उटीच्या वारीला लाखो भाविक त्र्यंबकेश्वरी येत असतात; परंतु मागील वर्षी जूनपासूनच कोरोनाचा शिरकाव त्र्यंबकेश्वरमध्ये झाला. मध्यंतरी कोरोनाचा कहर कमी झाला असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले. त्यामुळे सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. परिणामी येत्या शुक्रवारी (दि.७) भरणारी उटीच्या वारीची यात्रा कडक निर्बंधांमुळे रद्द करण्यात आली आहे. यासंदर्भात संत निवृत्तीनाथ महाराज प्रशासकीय समितीची बैठक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील के. एम. सोनवणे, ॲड. भाऊसाहेब गंभिरे, मुख्याधिकारी संजय जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या उपस्थितीत होऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या वर्षीप्रमाणेच यंदाही उटीची वारी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत साजरी करण्याचे ठरविण्यात आले.

परंपरेप्रमाणे मंदिरात यंदाही सप्ताह बसविण्यात आला आहे. चंदनाची खोडे उटी तथा गंध म्हणून उगाळली जात आहेत. दैनंदिन धार्मिक पूजा-आरती विधी सुरू आहेत. दरम्यान, देवाच्या संजीवन समाधीला आतील गाभाऱ्यात उष्णतेचा दाह जाणवू नये म्हणून उटीच्या वारीच्या दिवशी दुपारी १२ वाजेपासून चंदनाचे लेपन केले जाणार आहे. हे लेपन चढविल्यानंतर रात्री १० वाजता संजीवन समाधीवरील उटीचे लेपन धुण्यास सुरुवात होते आणि हीच उटी भाविक-वारकरी यांच्या अंगावर शिंपडली जाते. अनेक भाविका उटीचा प्रसाद आपल्या गावी नेतात. मात्र, यंदा या विधीला भाविक मुकणार आहेत.

Web Title: Trimbakeshwar's Ooty Wari canceled this year too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.