त्र्यंबकेश्वरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे ब्रम्हगिरी परिक्र मा मार्गाची स्वच्छता मोहीम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 08:48 PM2018-08-28T20:48:17+5:302018-08-28T20:49:21+5:30
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वरच्या याच भुमीच्या सौंदर्याच्या प्रेमात पडून लाखो लोक दरवर्षी त्र्यंबकेश्वरला भेट देत असतात. आणि श्रावणमासात तर पर्वकाळच असतो. या काळात ब्रम्हगिरी प्रदक्षिणेसाठी विशेष गर्दी तिसऱ्या श्रावणी सोमवारी जमते. या प्रदक्षिणेतला सात्विकपणा संपून तिला गलीच्छ रूप प्राप्त झाले आहे. प्रदक्षिणा मार्गावर सापडणाºया मद्याच्या, पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, गुटखा पुड्या खाद्या पदार्थांच्या पिशव्या, कागद परिक्रमामार्गावर मोठ्या प्रमाणात साचत असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढाकाराने परिसर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

या कचºयामुळे गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचे पर्यावरण संतुलन बिघडले आहे. प्लॅस्टीक मुळे झाडांची वाढ खुंटली आहे. बेसुमार जंगल तोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी होत आहे. आणि जर पडलाच तर गावात पुराचे पाणी घुसते. निसर्गाचा असमतोल वाढला आहे. त्या दृष्टीने त्र्यंबकेश्वर नगरपरिषद शाळा महाविद्यालये अनेक सेवाभावी ग्रुप संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सेवा विभाग आदी संस्था गेल्या काही वर्षांपासुन दरवर्षी तिसºया श्रावणी सोमवार प्रदक्षिणे नंतरच्या दुसºया दिवसापासुन परिक्रमामार्गावर सफाई मोहीमेचे काम हाती घेण्यात आले. या वर्षी देखील त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे परिक्र मामार्गाच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणेच यामध्ये सपकाळ नॉलेज हब, संदीप फाउंडेशन, व्ही. एन. नाईक महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक, कर्मचारी वृंद हरसुल येथील संघाचे सेवा कार्यकर्ते तसेच स्थानिक कार्यकर्ते आदी सर्वांनी मिळून या सफाई मोहीमेत सहभाग घेतला होता. यावेळी सुमारे तीन ट्रॅक्टर कचरा गोळा करु न त्याची विल्हेवाट लावण्यात आली. कचरा नियोजनबध्द दोन टप्यात पेगलवाडी फाटा, पहिणे फाटा, कोजुली ते गौतम ऋ षींच्या धसापर्यंत एक टीम. गणपतबारी ते सापगाव फाटा ते नमस्कार तथा गौतम ऋ षी अशा दोन्ही बाजूंनी दोन गट तयार करुन मार्गावरील दुतर्फा जमलेला कचरा गोळा करण्यात आला.