त्र्यंबकेश्वरचा रिव्हर्स सेव्हर प्रकल्प थंड्या बस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:12 AM2021-05-29T04:12:08+5:302021-05-29T04:12:08+5:30

त्र्यंबकेश्वर शहरात वारंवार उद‌्भवणाऱ्या पूरस्थितीवर तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर व सेवा फाउंडेशनचे स्वप्नील शेलार यांच्यासह तत्कालीन मुख्याधिकारी चेतना ...

Trimbakeshwar's reverse saver project in cold storage | त्र्यंबकेश्वरचा रिव्हर्स सेव्हर प्रकल्प थंड्या बस्त्यात

त्र्यंबकेश्वरचा रिव्हर्स सेव्हर प्रकल्प थंड्या बस्त्यात

Next

त्र्यंबकेश्वर शहरात वारंवार उद‌्भवणाऱ्या पूरस्थितीवर तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर व सेवा फाउंडेशनचे स्वप्नील शेलार यांच्यासह तत्कालीन मुख्याधिकारी चेतना मानुरे-केरूरे यांनी १६ कोटी रुपयांची रिव्हर्स सेव्हर ही योजना मंजूर करून आणली होती. या योजनेंतर्गत म्हातारओहोळ, नीलगंगा नीलपर्वत, संत जनार्दनस्वामी मठ या भागातील नाल्यातील पाणी एकत्र करून ते ३ मीटर्स रुंदीच्या चॅनल साइझमध्ये जमा करून गावाच्या बाहेरून खंडेराव मंदिर रस्त्याने जवळपास सात किलोमीटर लांबीच्या चॅनलमधून नदीपात्रात सोडण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पास तांत्रिक मंजुरी मिळाली असून, प्रशासकीय मान्यतेसाठी प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित आहे. गतवर्षी कोरोना कोविड लाॅकडाऊनमुळे प्रकरण रेंगाळले आहे. विशेष म्हणजे या कामासाठी पाच कोटींचा धनादेशदेखील तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी

दिला होता; पण तोही निधी कोविडमुळे रखडला आहे. या प्रकल्पाला चालना मिळाली तर पूरस्थितीवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. दरम्यान, परिषदेने मान्सूनपूर्व कामांना वेग दिला असून, पडक्या व धोकादायक घरांबाबत लोकांना सजग करण्यात येत आहे.

इन्फो

त्र्यंबकेश्वर शहरातील गटारी, पावसाळी नाले, नदीपात्र यांचे काँक्रिटीकरण झाले आहे. या ठिकाणी भाजीबाजार भरत असल्याने शिळा भाजीपाला पात्रात टाकून दिला जातो. शिवाय नागरिकांकडून टाकाऊ वस्तू पात्रात, नाल्यात फेकून दिल्या जातात. त्यामुळे नाले चोकअप होऊन गावात पावसाळ्यात पूरस्थिती उद‌्‌भवते. त्यामुळेच गेल्या ४ ते ५ वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्याधिकारी डाॅ. चेतना मानुरे-केरुरे यांनी पावसाळापूर्व नालेसफाईचा कार्यक्रम हाती घेतला होता. पालिकेकडून सफाईचा ठेका दिला जातो. त्यानुसार यंदाही गेल्या चार दिवसांपासून नालेसफाईची कामे सुरू झाली आहेत.

कोट...

सध्या त्र्यंबकेश्वर शहराच्या पावसाळापूर्व सफाई मोहिमेस वेग आला असून, युध्दपातळीवर कामे सुरू आहेत. तसेच गावात पावसाळ्यात पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रिव्हर्स सेव्हर प्रकल्प मार्गी लागून लवकरात लवकर तो अंमलात आणला जाईल.

- संजय जाधव, मुख्याधिकारी, त्र्यंबक नगर परिषद

फोटो- २८ त्र्यंबकेश्वर नालेसफाई १ आणि २

===Photopath===

280521\28nsk_13_28052021_13.jpg~280521\28nsk_14_28052021_13.jpg

===Caption===

फोटो- २८ त्र्यंबकेश्वर नालेसफाई १~फोटो- २८ त्र्यंबकेश्वर नालेसफाई  २ 

Web Title: Trimbakeshwar's reverse saver project in cold storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.