त्र्यंबककरांनो सावधान, दहा दिवस प्या पाणी गाळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 10:47 PM2022-01-05T22:47:51+5:302022-01-05T22:49:58+5:30

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आंबोली धरणावरून येणाऱ्या पाण्यासाठी कार्यरत असणाऱ्या नीलपर्वत पायथा येथील जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर मीडिया बदलण्याचे काम नगर परिषदेमार्फत गुरुवार (दि.६) पासून हाती घेण्यात येणार आहे. सदर काम साधारणपणे १० दिवस चालणार आहे. या कामामुळे जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी गाळण्याचे व शुद्धीकरणाचे काम तात्पुरते थांबवण्यात आले आहे. नगर परिषदेमार्फत पाणी फक्त निर्जंतुक करून पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून व गाळून प्यावे, अशी दवंडी शहरभर पिटवण्यात आली आहे.

Trimbakkars, be careful, drink water for ten days | त्र्यंबककरांनो सावधान, दहा दिवस प्या पाणी गाळून

त्र्यंबककरांनो सावधान, दहा दिवस प्या पाणी गाळून

Next
ठळक मुद्देशहरभर दवंडी : जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आंबोली धरणावरून येणाऱ्या पाण्यासाठी कार्यरत असणाऱ्या नीलपर्वत पायथा येथील जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर मीडिया बदलण्याचे काम नगर परिषदेमार्फत गुरुवार (दि.६) पासून हाती घेण्यात येणार आहे. सदर काम साधारणपणे १० दिवस चालणार आहे. या कामामुळे जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी गाळण्याचे व शुद्धीकरणाचे काम तात्पुरते थांबवण्यात आले आहे. नगर परिषदेमार्फत पाणी फक्त निर्जंतुक करून पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून व गाळून प्यावे, अशी दवंडी शहरभर पिटवण्यात आली आहे.

शहरातील नीलपर्वत जलशुद्धीकरण कार्यक्षेत्रातील भागात नगर परिषदेमार्फत बुधवारी (दि.५) ही दवंडी देण्यात आली. चौकीमाथा, इंदिरानगर, मेन रोड, तेली गल्ली, कडलग गल्ली, गाडगेबाबा लेन, डोबी गल्ली, कोथे गल्ली, पाटील गल्ली, टॅक्सी स्टॅण्ड परिसर, गायधनी गल्ली, गोकुळ दासलेन, पोस्ट गल्ली, डॉ. आंबेडकरनगर, शिक्षक कॉलनी, डॉक्टर कॉलनी (श्रीकृष्णनगर), हॉटेल ध्रुव पॅलेस परिसर, कुशावर्त तीर्थाच्या मागील परिसर व कामगार चाळ या भागातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. या जलशुद्धीकरण केंद्राचे काम दहा दिवस चालणार असल्याने तोपर्यंत पाणी उकळून व गाळूनच प्यावे लागणार आहे. नागरिकांनी या काळात आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, असेही आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

Web Title: Trimbakkars, be careful, drink water for ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.