त्र्यंबकचा लाचखोर पोलीस शिपाई गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 11:50 PM2022-03-16T23:50:11+5:302022-03-16T23:50:57+5:30
त्र्यंबकेश्वर : भावंडांवर दाखल झालेल्या गुन्ह्यात तपासकामात मदत करणे व जामीन मिळवून देण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी करणाऱ्या येथील पोलीस ठाण्यातील शिपाई मुकेश भिकचंद लोहार (४५) याला लाचलुचपत विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.

वरसविहीर, ता. त्र्यंबकेश्वर येथील तक्रारदाराकडे लोहार या पोलीस शिपायाने १६ डिसेंबर २०२१ रोजी लाचेची मागणी केली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचला असता लोहार हा दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडला गेला. सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक भोये - बेलगावकर, सहसापळा अधिकारी साळुंखे, पोलीस हवालदार मोरे, प्रकाश महाजन, पळशीकर, देशमुख, चालक जाधव, चालक गांगुर्डे या पथकाने ही कारवाई केली.