त्र्यंबकवासीय त्रस्त
By admin | Published: December 27, 2016 11:19 PM2016-12-27T23:19:31+5:302016-12-27T23:20:04+5:30
त्र्यंबकवासीय त्रस्त
संताप : कचरा साफ करण्याची मागणीत्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचा कचरा डेपो थेट नागरी वस्तीपर्यंत पोहोचला होता. याबाबत लोकांनी अनेक तक्र ारी केल्या. शेवटी पालिकेने डंपिंग रस्त्यावरील संपूर्ण कचरा हटविला. पालिकेच्या लाकडाच्या वखारीसाठी ठेवलेल्या गुदामासमोरील प्रांगणदेखील कचऱ्याने पूर्णपणे भरले होते, तेही आता स्वच्छ झाले आहे. त्याबद्दल पालिकेस धन्यवाद दिले पाहिजे.
त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेची कचरा विल्हेवाटीची समस्या तरी अजूनही मिटलेली नाही. वास्तविक नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम कचरा डेपोची समस्या मिटविण्यासाठी प्राधान्यक्रम देईल. तथापि, कार्यभार स्वीकारून वर्ष झाले आहे पण कचरा विल्हेवाटीची समस्या अजूनही ‘जैसे थे’च आहे. याबाबत हरित लवादाने पालिकेवर ठपकाही ठेवला आहे. तरीही पालिकेला कचरा विल्हेवाट करता आली नाही. कचरा डेपोची समस्या तशी आजची नाही. पण कचरा विल्हेवाटीचा प्रश्न मीच सोडविणार अशी ग्वाही नगराध्यक्ष विजया दीपक लढ्ढा यांनी दिली होती. अर्थात त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्नही सुरू केले होते. त्यानंतर मात्र माशी कुठे शिंकली कोण जाणे ! त्यानंतर मात्र त्यांनी केलेली घोषणा हवेत विरली. (वार्ताहर) कचरा विल्हेवाटीचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून गोरक्षनाथ घाट बांधला. या बाजूला कचरा डेपो होता. सिंहस्थ असेपर्यंत घाट व्यवस्थित होता. त्यानंतर मात्र घाटाची दुर्दशा झाली. पवित्र गोदामाईची आज गटारगंगा झाली आहे. या घाटापर्यंत कचऱ्याचे ढीग होते. अर्थात आता येथे कचरा नाही. पण सर्वच घाट साफ होणे गरजेचे आहे. तसेच उर्वरित कचऱ्याची विल्हेवाट लावावी व कचरा डेपोची प्रलंबित समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे.