संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिराचा जीर्णोद्धार त्र्यंबकेश्वर : शनिवारी पायाभरणी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 12:20 AM2018-05-04T00:20:56+5:302018-05-04T00:20:56+5:30
त्र्यंबकेश्वर : येथील संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधी मंदिराचा प्रत्यक्ष पायाभरणी सोहळा शनिवारी (दि.५) रोजी आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या उपस्थितीत होत आहे.
त्र्यंबकेश्वर : येथील संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधी मंदिराचा प्रत्यक्ष पायाभरणी सोहळा शनिवारी (दि.५) रोजी आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थानचे अध्यक्ष कीर्तन केसरी संजयनाना धोंडगे व नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्या हस्ते होत आहे. संस्थानचे पुजारी तथा विश्वस्त जयंत महाराज गोसावी पूजा सांगणार आहेत. संस्थानचे विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड, पवन भुतडा, रामभाउ मुळाणे, पंडितराव कोल्हे, पुंडलिकराव थेटे, धनश्री हरदास, ललिता शिंदे, अविनाश गोसावी, सोपान गोसावी, जिजाबाई लांडे, डॉ.चेतना केरुरे यावेळी उपस्थित राहणार आहेत. मंदिर जीर्णोद्धाराचा १५ कोटी रुपयांचा आराखडा पूर्ण झाला आहे. प्रस्तावित आराखड्यास अंतिम मंजुरी मिळाली असल्याची माहिती संजय महाराज धोंडगे यांनी दिली. मंदिराचे डिझाइन वास्तुविशारद अमृता पवार यांनी केले आहे. वारकरी सांप्रदायाचे आदरस्थान संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांनी शक्ती दिल्याने काम उभं करण्याची प्रेरणा मिळाली. या कार्यासाठी निवृत्ती भक्तांनी मदत करावी, असे आवाहन ह.भ.प. संजय नाना धोंडगे यांनी केले आहे.