गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकला संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:46 AM2018-09-21T00:46:45+5:302018-09-21T00:47:15+5:30
त्र्यंबकेश्वर : येत्या रविवारी गणेश विसर्जनानिमित्ताने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहरातील पोलिसांतर्फे संचलन करण्यात आले. गणेश विसर्जन शांततेत पार पडावे यासाठी पोलीस यंत्रणा सजग आहेत.
त्र्यंबकेश्वर : येत्या रविवारी गणेश विसर्जनानिमित्ताने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहरातील पोलिसांतर्फे संचलन करण्यात आले. गणेश विसर्जन शांततेत पार पडावे यासाठी पोलीस यंत्रणा सजग आहेत.
संचलनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे, उपनिरीक्षक सुरेश चौधरी, पोउनि कैलास आकुले, गोपनीय पोलीस कॉन्स्टे. काकड आदी सहभागी झाले होते. गणेश विसर्जन मिरवणूक गावातील सर्व मंडळांनी शांततेत व विसर्जनदेखील वेळेपूर्वीच करावे, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. एक गाव एक गणपतीत्र्यंबकेश्वर पोलिसांच्या कार्यक्षेत्रात ७९ गणेश मंडळे तर २२ गणेश मंडळे एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवून आहेत. शहरात लहान-मोठी ३० गणेश मंडळे आहेत. या सर्व गणेश मंडळांचे गणेश विसर्जन शांततेत होण्यासाठी पोलिसांनी संचलन केले.