पिंपळगाव पोलीस ठाण्यात ट्रिंग ट्रिंग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 10:28 PM2020-08-05T22:28:58+5:302020-08-06T01:31:40+5:30
पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव पोलीस ठाण्याचा टेलिफोन पंधरा दिवसांपासून बंद असल्याने पिंपळगाववासीय हैराण झाले आहेत. एखाद्या घटनेची तक्रार कशी करायची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पंधरा दिवस होऊनही पोलिसांनी सेवा सुरू करून घेण्याची तसदी घेतलेली नसल्यामुळे २४ गावांची हद्द राखणारे हद्दपार झाल्याची प्रतिक्रिया सामान्य नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत.
पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव पोलीस ठाण्याचा टेलिफोन पंधरा दिवसांपासून बंद असल्याने पिंपळगाववासीय हैराण झाले आहेत. एखाद्या घटनेची तक्रार कशी करायची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पंधरा दिवस होऊनही पोलिसांनी सेवा सुरू करून घेण्याची तसदी घेतलेली नसल्यामुळे २४ गावांची हद्द राखणारे हद्दपार झाल्याची प्रतिक्रिया सामान्य नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत.
पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात बीएसएनएलची दूरध्वनी सेवा आहे. मात्र सेवा पंधरा दिवसांपासून बंद आहेत. परिसरातील हैराण झालेल्या नागरिकांना एखादी तक्रार करण्यासाठी किंवा माहिती देण्यासाठी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे गाठावे लागत आहे. पिंपळगाव शहर व परिसरातील गावे मिळून या पोलीस ठाण्याच्या परिसरात २४ गावांचा परिसर आहेत. या सर्व गावांची लोकसंख्यादेखील पाच लाखांच्या पुढे आहे. परंतु पोलीस ठाण्याची अत्यावश्यक सेवा देणारा टेलिफोनच बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले की, पोलीस चौकी ही नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची असते. चौकीतील फोन बंद असल्यामुळे मोबाइलवरूनच फोन करावा लागतो. कधी कधी मोबाइलला रेंज नसते अशा वेळी चौकीतील दूरध्वनी महत्त्वाचे ठरतात. मात्र, तेच बंद असल्यामुळे त्याचा कामावर परिणाम होतो. चौकीत तक्र ार आल्यानंतर त्याची माहिती पोलीस ठाण्याला देणे, इतर कार्यालयीन कामांची माहिती देणे अडचणीचे ठरते. त्यावेळी येथील कर्मचारी आपल्या मोबाइलवरून माहिती देतात तर कधी पोलीस ठाण्याच्या अंमलदाराला ‘मिस्ड कॉल’ देतात. त्यानंतर परत फोन करून माहिती घेतली जाते. सुरक्षा व शांतता राखणारेच कव्हरेच क्षेत्राच्या बाहेर असल्याने सामान्य तक्रारदारांना तक्रार दाखल करायला पायपीट करत पोलीस ठाणे गाठावे लागत आहे.
बीएसएनएलच्या वरिष्ठ कार्यालयात संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, पिंपळगाव पोलीस ठाण्यातील दूरध्वनीचे पंधरा दिवसांपासून बिल थकल्यामुळे सेवा बंद केली आहे. पोलीस कार्यालयाकडून बिल भरणे शक्य झालेले नाही तर बिलाचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, ती पार पाडण्याची मोठी प्रक्रि या आहे. याबाबत आमचा वरिष्ठ स्तरावरून पाठपुरावा असल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.