पिंपळगाव लेप येथे चंपाषष्ठीनिमित्त यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 10:51 PM2019-12-03T22:51:52+5:302019-12-03T22:53:10+5:30

मानोरी : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथे चंपाषष्ठीनिमित्त खंडेराव महाराज यात्रोत्सव व बारागाड्या ओढण्याचा कार्यक्र म पार पडला. यानिमित्त महिलांनी खंडेराव महाराज मंदिर प्रांगणात सडासंमार्जन केले होते. तसेच गावातून अश्वाची व मानकरी नवदेव सुभाष रसाळ यांची ‘यळकोट यळकोट जय मल्हार’चा जयघोष करत मिरवणूक काढण्यात आली.

Trip to Pimpalgaon for Champa | पिंपळगाव लेप येथे चंपाषष्ठीनिमित्त यात्रा

येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथे चंपाषष्ठीनिमित्त बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी भाविकांनी गर्दी केली होती.

Next
ठळक मुद्देयेवला : बारागाड्या ओढण्याचा कार्यक्र माला भाविकांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरी : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथे चंपाषष्ठीनिमित्त खंडेराव महाराज यात्रोत्सव व बारागाड्या ओढण्याचा कार्यक्र म पार पडला. यानिमित्त महिलांनी खंडेराव महाराज मंदिर प्रांगणात सडासंमार्जन केले होते. तसेच गावातून अश्वाची व मानकरी नवदेव सुभाष रसाळ यांची ‘यळकोट यळकोट जय मल्हार’चा जयघोष करत मिरवणूक काढण्यात आली.
यानंतर भंडार उधळत मानकरी सुभाष रसाळ यांनी बारागाड्या ओढल्या. खंडेराव महाराज यात्रोत्सव काळात वाघे मंडळींचे जागरण गोंधळ झाले. रहाडी जागरण सोमवारी (दि.२) झाले. यावेली नवनाथ लांडिबले, बाबासाहेब गायकवाड, साहेबराव रसाळ, सुखदेव रसाळ, माधव रसाळ, भागवत दौंडे, बबन दौंडे, रामभाऊ दौंडे, प्रकाश गोधडे, शिवाजी गोधडे, राजाराम माळी, विलास दुनबळे, कैलास दुनबळे, आतिश दुनबळे, हनुमान काळे, नाना दौंडे, बाळू रसाळ, दिलीप रसाळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.अंदरसूलला बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रमअंदरसूल : चंपाषष्ठीनिमित्त येथील खंडोबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी मूर्तीचे विधिवत पूजन करून दुपारी पालखी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. गावात ठिकठिकाणी सुवासिनींनी पालखीचे पूजन केले. संध्याकाळी ६ वाजता बारागाड्या ओढण्यात आल्या. जय मल्हार, बोला सदानंदाचा येळकोट, खंडोबा महाराज की जय या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. बारागाड्या ओढल्यानंतर यात्रेला सुरुवात झाली.

Web Title: Trip to Pimpalgaon for Champa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.