बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तचे प्रमाण तिप्पट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 01:10 AM2020-07-29T01:10:26+5:302020-07-29T01:12:05+5:30

नाशिक जिल्ह्यात रविवारी १६९ नवीन रुग्ण बाधित आढळून आले असून, त्या तुलनेत अडीच पटीहून अधिक तब्बल ४७३ रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. मंगळवारी (दि. २८) पाच जणांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ४७२ झाली आहे.

Triple the amount of corona free compared to the affected! | बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तचे प्रमाण तिप्पट !

बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तचे प्रमाण तिप्पट !

Next
ठळक मुद्देकोरोना : जिल्ह्यात मंगळवारी ४७३ रुग्णांनी केली संसर्गावर मात

नाशिक : जिल्ह्यात रविवारी १६९ नवीन रुग्ण बाधित आढळून आले असून, त्या तुलनेत अडीच पटीहून अधिक तब्बल ४७३ रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. मंगळवारी (दि. २८) पाच जणांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ४७२ झाली आहे.
मंगळवारची दिलासादायक बाब म्हणजे दाखल झालेल्या बाधितांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची ४७३ संख्या ही अडीचपटीहून अधिक आहे. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्याचे प्रयत्न आरोग्य विभागाकडून सुरू आहेत. त्यामुळेच मंगळवारी बरे होऊन घरी सोडलेल्यांची संख्या प्रथमच साडेचारशेपेक्षा अधिक अर्थात ४७३ झाली. बळी गेलेल्या पाच रुग्णांमध्ये नाशिक शहरातील तीन, एक इगतपुरीचा, तर दिंडोरीच्या नागरिकाचा एक असे हे प्रमाण आहे.
केवळ २,४१४ बाधितांवर उपचार
जिल्ह्यात दाखल संशयितांची संख्या १०१३वर तर प्रलंबित अहवालांची संख्या ११११ वर पोहोचली आहे. मंगळवारी बाधित नवीन १०१३ रुग्णांमुळे एकूण बाधितसंख्या १२,६५७ झाली आहे. त्यातील ९७७१ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन त्यांच्या घरी परतले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या २,४१४ झाली आहे.
पेठ तालुका कोरोनामुक्त
जून महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, देवळा आणि कळवण ही चार तालुके कोरोनामुक्त होते. मात्र, जुलै महिना सुरू होईपर्यंत प्रारंभी देवळा आणि कळवण तर त्यानंतर सुरगाणा आणि पेठ तालुक्यातही कोरोनाचे काही बाधित आढळून आले. मात्र, जुलैच्या अखेरपर्यंत त्यातील पेठ तालुक्यातील बाधित पूर्णपणे बरे होऊन घरी परतले असल्याने पेठ तालुका पुन्हा एकदा कोरोनामुक्त झाला आहे.

Web Title: Triple the amount of corona free compared to the affected!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.