इगतपुरी तालुक्यात  माळवाडी येथे तिहेरी हत्याकांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 01:45 AM2018-07-01T01:45:44+5:302018-07-01T01:46:02+5:30

इगतपुरी तालुक्यातील खेड ग्रामपंचायत हद्दीतील माळवाडी येथे शनिवारी (दि. ३०) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास तरुणाने एकाच कुटुंबातील तिघांवर चाकूने वार करत त्यांची निर्घृण हत्या केली. या तिहेरी हत्याकांडाने इगतपुरी तालुका हादरला आहे.

 Tripura massacre at Malwadi in Igatpuri taluka | इगतपुरी तालुक्यात  माळवाडी येथे तिहेरी हत्याकांड

इगतपुरी तालुक्यात  माळवाडी येथे तिहेरी हत्याकांड

Next

घोटी : इगतपुरी तालुक्यातील खेड ग्रामपंचायत हद्दीतील माळवाडी येथे शनिवारी (दि. ३०) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास तरुणाने एकाच कुटुंबातील तिघांवर चाकूने वार करत त्यांची निर्घृण हत्या केली. या तिहेरी हत्याकांडाने इगतपुरी तालुका हादरला आहे. दरम्यान, घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत जमावास शांततेचे आवाहन करत संशयित आरोपीस ताब्यात घेतले.  माळवाडी येथे शनिवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास संशयित आरोपी सचिन गणपत चिमटे (२३) याने नात्याने चुलत भावबंद असलेल्या घरातील तीन जणांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. इतका शिकलेला असूनसुद्धा तुला नोकरी मिळत नाही, याबाबत वारंवार डिवचल्याचा राग मनात ठेवून हे हत्याकांड घडविल्याची कबुली संशयित आरोपीने पोलिसांपुढे दिली आहे. हिराबाई शंकर चिमटे  (५५) ह्या आपल्या नातवासह घरात बसलेल्या होत्या.  सून मंगला गणेश चिमटे (३०) या घरामागे केरकचरा टाकण्यासाठी गेल्या असता, संशयित सचिन याने मंगला यांना एकटे गाठून धारदार चाकूने गळ्यावर वार केले. त्यात मंगला खाली कोसळल्या यावेळी मुलगा यश याने आपल्या आईवर झालेला हल्ला पाहताच घराकडे धाव घेत आजीला घडलेला प्रकार सांगितला.
तोपर्यंत आरोपीने मंगला हिस घरात ओढत आणले असता सासू हिराबाई यांनी त्यास जोरदार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने हिराबार्इंच्याही गळा आणि मानेवर धारदार चाकूने वार केले. त्यानंतर नातू रोहित (४ ) याच्या गळ्यावर सचिनने वार केले. दुसरा नातू यश (६) हा घरातून पळून जात असताना आरोपीने त्याच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आजी, आई आणि भावास पाहून आपला जीव वाचवण्यासाठी यश याने आपला डावा हात पुढे केल्याने तो जखमी झाला. जखमी यशने तिथून पळ काढत गावातील मुख्य रस्त्यावर धाव घेत नागरिकांकडे मदतीसाठी मागणी करू लागला. यावेळी गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीस चांगलाच चोप दिला. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना कळविली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी तातडीने आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत आरोपीस ताब्यात घेतले आणि जमावास शांत करत मृतदेह शवविच्छेदनासाठी घोटी ग्रामीण रु ग्णालयात पाठवण्यात आले. या हत्याकांडामुळे इगतपुरी तालुक्यासह पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.
पोलिसांचे शांततेचे आवाहन
घटनेची माहिती तालुक्यात पसरताच लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी रु ग्णालयात एकाच गर्दी केली. यावेळी पोलिसांनी शांततेचे आवाहन करीत जमावास शांत केले. घटनेचे गांभीर्य पाहता शवविच्छेदनासाठी आणलेले मृतदेह नंतर नाशिक जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले. या घटनेने इगतपुरी तालुका हादरून गेला आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी आरोपीचे आई, वडील आणि दोन बहिणींनाही ताब्यात घेतले आहे. घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस उपाधीक्षक अतुल झेंडे घटनास्थळी दुपारी रवाना झाले.
आरोपीची कबुली
संशयित आरोपी सचिन याचे बारावी पर्यंत शिक्षण झाले होते. या खुनाचे कारण पोलिसांपुढे सांगताना आपणास नेहमी ‘तूू इतका शिकला सवरलेला असताना तुला नोकरी मिळत नाही’ या सततच्या टोमण्याने व्यथित होऊन सदर गुन्हा केल्याची प्राथमिक कबुली पोलिसांपुढे संशयितआरोपीने दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जमिनीचा वाद
वर्षभरापूर्वी पाच भावांत जमीन वाट्याला कमी आली होती. त्यावरून वाद विकोपाला गेला होता. चाळीस एकर जमीन वडीलभाऊ हरी नामदेव चिमटे यांच्या नावावर होती. चार वर्षांपूर्वी हरी हे मयत झाल्यावर उर्वरित चार भावांत झालेले हिस्से मनासारखे झाले नव्हते. त्यातून लक्ष्मण, शंकर, भीमा व गणपत चिमटे यांच्यात वर्षभरापूर्वी भांडण होऊन वाद मिटविण्यात आला होता; मात्र संशयित आरोपी सचिन गणपत चिमटे याच्या मनात चुलते शंकर यांच्या बाबत राग होता. संधीचा फायदा घेत संशयित आरोपीने शनिवारी तिहेरी खून करीत आपल्या मनातील खदखद उघड केल्याचे दिसून आले.

Web Title:  Tripura massacre at Malwadi in Igatpuri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून