शास्त्रीय संगीताचा त्रिवेणी आविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 12:57 AM2017-10-02T00:57:52+5:302017-10-02T00:58:13+5:30
‘हारे मन काहे को सोच करे’, ‘लागी लागिरे सावरियां’ यांसह विविध गीतांचे सादरीकरण मधुरा बेळे आणि अमृता रहाळकर - मोगल यांनी गोविंदनगर येथील विनायक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या संगीत मैफलीत केले.
नाशिक : ‘हारे मन काहे को सोच करे’, ‘लागी लागिरे सावरियां’ यांसह विविध गीतांचे सादरीकरण मधुरा बेळे आणि अमृता रहाळकर - मोगल यांनी गोविंदनगर येथील विनायक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या संगीत मैफलीत केले.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वर, ताल आणि लय असा त्रिवेणी आविष्कार या संगीत मैफलीतून देवीच्या चरणी अर्पण करण्यात आला. मैफलीची सुरुवात मधुरा बेळे यांनी मुलतानी रागात सादर केलेल्या ‘हारे मन काहे को सोच करे’ या पारंपरिक बंदिशीने केली. यानंतर द्रुत त्रितालातील ‘लागी लागी रे सावरिया’, तर अमृता रहाळकर मोगल यांनी ललिता गौरी रागातील ‘प्रीतम सय्या दरस दिखा जा’ ही पारंपरिक त्रितालातील बंदिश सादर करत उपस्थितांची मने जिंकली. संगीत मैफल उत्तरोत्तर रंगत असताना ‘दुर्गा माता ज्ञानी देवी’ या रागमालेतील जयजयवंती, भुपाली, देस, सरस्वती, सोहनी, सुहा, ललित, दरबारी, बागेश्री, वसंत आणि बहार या अनेकविध रागांनी ही संगीत मैफल विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवली. या मैफली दरम्यान नितीन वारे (तबला), प्रसाद गोखले (संवादिनी) तर तानपुºयावर स्वराली जोगळेकर, मधुली मुतालिक यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा फासे यांनी केले. यावेळी राजाभाऊ मोगल ,डॉ. निशिगंधा मोगल, डॉ. अविराज तायडे, नितीन वारे, राजा पुंडलिक, विनय बेळे यांच्यासह संगीतपे्रमी उपस्थित होते.