सक्षम लोकांना राष्टÑवादीचे तिकीट : पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 12:48 AM2018-05-03T00:48:55+5:302018-05-03T00:48:55+5:30
नाशिक : सध्याचे राजकारण बेरजेचे असून, राष्टÑवादी कॉँग्रेस आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या निष्ठावंतांना निश्चित न्याय देईल; परंतु निवडून येण्याची क्षमता ठेवणाऱ्या अन्य पक्षांच्या लोकांनाही प्रसंगी पक्षाकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

विधान परिषदेचे उमेदवार शिवाजी सहाणे यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील आगामी निवडणुका कॉँग्रेसला सोबत घेऊन लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी, पोटनिवडणुका होत असलेल्या बीड व लातूर या दोन्ही मतदारसंघांच्या जागा पूर्वी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या होत्या व काही अपरिहार्य परिस्थितीत त्या कॉँग्रेसला सोडण्यात आल्या होत्या. आता कॉँग्रेस सदरच्या जागा लढविण्यास फारशी उत्सुक नसल्यामुळे त्या जागा राष्टÑवादीला परत मिळाव्या अशी मागणी करण्यात आली आहे व विधान परिषदेची निवडणूक दोन्ही कॉँग्रेसने एकत्र लढवावी यासाठी बोलणी सुरू असून, अद्यापतरी कॉँग्रेसने राष्टÑवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेच्या नाशिकच्या जागेवर गेल्या निवडणुकीत शिवाजी सहाणे यांनी राष्टÑवादीचे जयंत जाधव यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती, परंतु यंदा त्यांनी राष्टÑवादीकडून निवडणूक लढविण्यासाठी पक्षाकडे विनंती केली व स्थानिक नेत्यांनीही सहाणे यांना उमेदवारी देण्यास सहमती दर्शविल्याने ते पक्षाचे उमेदवार असून, त्यांना मित्रपक्षांनीही पाठिंबा दिल्यामुळे येत्या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून ३१ मेपर्यंत प्रत्येक गावातील प्रत्येक बूथनिहाय कार्यकर्त्यांची नेमणूक करण्याच्या सूचना शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षांना देण्यात आल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.