नाशिकरोड परिसरात टवाळखोरांचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:50 AM2018-08-27T00:50:08+5:302018-08-27T00:50:23+5:30
परिसरातील शाळा, महाविद्यालय, खासगी क्लासेस या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थिनींची टवाळखोर व रोडरोमिओंकडून छेडछाड केली जात आहे. यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
नाशिकरोड : परिसरातील शाळा, महाविद्यालय, खासगी क्लासेस या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थिनींची टवाळखोर व रोडरोमिओंकडून छेडछाड केली जात आहे. यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
राष्टवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या वतीने उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परिसरातील शाळा, महाविद्यालय व खासगी क्लासेसमध्ये येणाºया विद्यार्थिनींची टवाळखोरांकडून छेडछाड केली जात असून, धूम स्टाईल गाड्या चालवून त्रास दिला जात आहे. शाळा, महाविद्यालय सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेस पोलिसांची गस्त वाढवून टवाळखोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर राष्टÑवादी कॉँग्रेसचे योगेश निसाळ, संदीप टिळे, राजाभाऊ जाधव, जयप्रकाश गायकवाड, संकेत मुठाळ, संकेत देवरे, महेश सरोदे, आकाश पाळदे, प्रीतेश टिळे, महेश निंबेकर, आशिष गायखे, सनी निंबेकर आदींच्या सह्या आहेत.
कारवाईची मागणी
मारामाºयांचे प्रकारदेखील नित्याचेच झाल्याने विद्यार्थी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. टवाळखोरांकडून होणाºया छेडछाडीने विद्यार्थिनी त्रस्त झाल्या असून, विशेष करून ग्रामीण भागातील विद्यार्थिनी जास्त त्रस्त झाल्या आहेत. छेडछाडीकडे विद्यार्थिनी दुर्लक्ष करीत असल्याने टवाळखोरांचे फावते आहे.