नाशिकरोड परिसरात ट्रकच्या बॅटऱ्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 03:53 PM2018-08-12T15:53:35+5:302018-08-12T15:54:33+5:30
नाशिक : नाशिकरोड परिसरात ट्रकच्या बॅट-या चोरून नेण्याच्या घटना सुरूच असून सौभाग्य नगरमधील रस्त्यालगत पार्क केलेल्या ट्रक व ट्रॅक्टरच्या बॅट-या चोरट्यांनी चोरून नेल्या़
नाशिक : नाशिकरोड परिसरात ट्रकच्या बॅट-या चोरून नेण्याच्या घटना सुरूच असून सौभाग्य नगरमधील रस्त्यालगत पार्क केलेल्या ट्रक व ट्रॅक्टरच्या बॅट-या चोरट्यांनी चोरून नेल्या़
सौभाग्य नगरमधील रहिवासी गणेश सहाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ६ व ७ आॅगस्ट रोजी यांनी आपला ट्रकची (एमएच ३१, सीबी ३४१) ७ हजार रुपये किमतीची बॅटरी चोरून नेली़ तसेच मोरे मळ्यातील रामेश्वर मोगल यांच्या ट्रॅक्टरची (एमएच १५, ए ३०५) ७ हजार रुपये किमतीची बॅटरी चोरट्यांनी चोरून नेली़
या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
हॉस्पिटलजवळून दुचाकीची चोरी
/>नाशिक : शताब्दी हॉस्पिटल परिसरातील रहिवासी संजय पाटील यांची २० हजार रुपये किमतीची होंडा पॅशन दुचाकी (एमएच १८ एएफ ४८०४) चोरट्यांनी कमोद कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमधून चोरून नेली़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दुचाकीच्या धडकेत तीन जखमी
नाशिक : विरूद्ध दिशेने भरधाव येणा-या दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत तीन जण जखमी झाल्याची घटना पेठरोडवरील समृद्धी हॉस्पिटलसमोर घडली़ दत्तनगरयेथील सागर चंदनशीव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी (दि़९) बहिण व पुतणीला घेऊन दुचाकीवरून (एमएच १५, एफझेड ६००४) जात होते यावेळी समोरून विरूद्ध दिशेने येणा-या दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली़ यामध्ये ते तिघेही जखमी झाले तर दुचाकीस्वार फरार झाला़
पंचवटीतून दुचाकींची चोरी
नाशिक : पंचवटीतील अमृतधाममधील रहिवासी हेमंत चव्हाण यांची तीस हजार रुपये किमतीची पॅशन दुचाकी (एमएच ४१ एसी ९६२१) चोरट्यांनी इमारतीच्या पार्किंगमधून चोरून नेली़ या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चॉपर बाळगणा-यास अटक
नाशिक : रामकुंडावरील म्हसोबा पटांगणावर चॉपर घेऊन फिरणा-या दोघा संशयितास पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ प्रशांत लोंढे (रा़देवळाली कॅम्प), संतोष वलकर (पंचवटी) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत़ या दोघांवरही शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाईलची चोरी
नाशिक : डिजीपीनगर येथील रहिवासी ज्ञानेश्वर पाटील हे शुक्रवारी (दि़१०) अंबड औद्योगिक वसाहतीतील पानटपरीवर थांबले असता त्यांची नजर चुकवून चोरट्याने त्यांचा महागडा मोबाईल चोरून नेला़ याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.