तारवालानगर चौफुलीवर ट्रक-बसचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:45 PM2018-10-13T23:45:28+5:302018-10-14T00:11:01+5:30

गुजरातहून येणाऱ्या एसटीला पेठरोड लिंक रोडने भरधाव आलेल्या मालट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एसटीचा चालक मनीषभाई नथूभाई वनकर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.१३) पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर घडली़ या अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

Truck-Bus Accident on Tarawalnagar Chauplule | तारवालानगर चौफुलीवर ट्रक-बसचा अपघात

तारवालानगर चौफुलीवर ट्रक-बसचा अपघात

Next

पंचवटी : गुजरातहून येणाऱ्या एसटीला पेठरोड लिंक रोडने भरधाव आलेल्या मालट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एसटीचा चालक मनीषभाई नथूभाई वनकर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.१३) पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर घडली़ या अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या अपघाताची पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा अपघात या ठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरात राज्यातील एसटी बस (क्रमांक जीजे १८, झेड ३१२६) प्रवासी घेऊन दिंडोरीरोडने नाशिककडे येत होती़ पहाटेच्या सव्वातीन वाजेच्या सुमारास तारवालानगर चौफुलीवर मेरी-पेठरोड लिंक रस्त्याने भरधाव आलेल्या मालट्रकने क्रमांक (एमपी ०९, एचएच ८६८०) ने जबर धडक दिली. यावेळी बसचालकाने बस वाचविण्याचा प्रयत्न करीत बस डाव्या हाताला वळविल्याने ती दुभाजकावरील सिग्नलवर आदळली़ यामध्ये सिग्नल पडून नुकसान झाले असून, बसचालकाच्या डोक्यास मार लागला असून, बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत़
तारवालानगर चौफुली मृत्यूचा सापळा
वाहतूक नियंत्रणात असावी यासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मात्र, रात्रीच्या वेळी वाहनधारक दुर्लक्ष करीत असल्याने वारंवार अपघात घडतात. या अपघातांमुळे तारवालानगर चौफुली मृत्यूचा सापळा बनली आहे.

Web Title: Truck-Bus Accident on Tarawalnagar Chauplule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.