मांस घेऊन जाणारा ट्रक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:38 AM2019-02-24T00:38:55+5:302019-02-24T00:39:15+5:30
परिसरातील स्टेट बँक चौकात मंगलरूप गोवत्स सेवा ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी ओझरहून मुंबईच्या दिशेने जनावरांचे मांस घेऊन जाणारा ट्रक पकडला आहे.
सिडको : परिसरातील स्टेट बँक चौकात मंगलरूप गोवत्स सेवा ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी ओझरहून मुंबईच्या दिशेने जनावरांचे मांस घेऊन जाणारा ट्रक पकडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुमारे सात ते आठ टन जनावरांचे मांस भरलेला आयशर ट्रक क्रमांक एमएच १५एफव्ही १३५१ ताब्यात घेतला असून, शनिवारी (दि.२३) उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
ओझरहून जवळपास सात ते आठ टन जनावरांचे मांस भरलेला आयशर ट्रक मुंबईकडे जात होता. ही माहिती मंगल रूप गोवत्स ट्रस्टच्या पुरुषोत्तम आव्हाड, शुभम भडांगे, तेजस मिटकर, संजय बागुल, आकाश राजपूत या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी स्टेट बँक चौकाजवळ सापळा रचून संबंधित ट्रक अडवला. या ट्रकमध्ये मांस असल्याचे समोर आल्याने त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात आणून ट्रक जमा केला.
याप्रकरणी पुरुषोत्तम आव्हाड यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आयशर ट्रकचालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.