राहुड शिवारात कापसासह ट्रक जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 17:35 IST2019-02-11T17:33:53+5:302019-02-11T17:35:01+5:30
चांदवड : तालुक्यातील राहुड शिवारात मुंबई - आग्रा महामार्गावर कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत कापसासह ट्रक जळून खाक झाला.

राहुड शिवारात कापसासह ट्रक जळून खाक
शनिवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास कापूस भरून खंडवा, मध्य प्रदेश येथून कापसाच्या गाठी भरून मालट्रक (क्र. एमपी ०९ एचएफ ३९९६) मुंबई येथे पोहोच करण्यासाठी निघाला होता. मुंबई -आग्रारोडवर राहुडजवळ ट्रकमधील वायरिंगचे शॉर्टसॅकिट होऊन धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे लक्षात येताच चालक व क्लीनर यांनी लगेच ट्रकमधून उडी घेतली. तोपर्यंत ट्रकमधील कापसाच्या गाठींनी पेट घेतला. काही मदत पोहचण्याच्या आत ट्रकमधील कापूस जळून खाक झाला तर लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत ट्रकचालक फकरू खान आश्रफ खान (४१), मनावड, जि. धार, मध्य प्रदेश यांनी चांदवड पोलीस स्टेशनला खबर दिल्याने पोलिसांनी नोंद केली असून, अधिक तपास पोलीस हवालदार कैलास जगताप करीत आहेत.