ट्रकच्या धडकेने दुचाकीवरील दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 09:10 PM2021-03-20T21:10:47+5:302021-03-21T00:53:15+5:30

विंचूर : विंचूर-लासलगाव रस्त्यावरील मंजुळा पॅलेसच्या समोर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोन तरुण जागीच ठार झाले. दुचाकीला धडक दिल्यानंतर ट्रक रस्त्याच्या बाजूलाच शेतात असलेल्या शेतमजुराच्या घरात घुसल्याने चार जण जखमी झाले. विवेक दरेकर व शेखर रमेश गुंजाळ, अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

A truck crash kills two on a two-wheeler | ट्रकच्या धडकेने दुचाकीवरील दोघे ठार

विवेक दरेकर

Next
ठळक मुद्देविंचूर-लासलगाव रस्त्यावर भीषण अपघात

विंचूर : विंचूर-लासलगाव रस्त्यावरील मंजुळा पॅलेसच्या समोर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोन तरुण जागीच ठार झाले. दुचाकीला धडक दिल्यानंतर ट्रक रस्त्याच्या बाजूलाच शेतात असलेल्या शेतमजुराच्या घरात घुसल्याने चार जण जखमी झाले. विवेक दरेकर व शेखर रमेश गुंजाळ, अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

हनुमाननगर येथील विवेक कारभारी दरेकर (२८) व शेखर रमेश गुंजाळ (२६) हे दुचाकीवरून विंचूरकडून लासलगावकडे जात होते. त्याच वेळेस लासलगावकडून विंचूरच्या दिशेने भरधाव वेगाने येत असलेला ट्रक (एम एच १५ बी जे ६१५६) चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक बसताच विवेक दरेकर व शेखर गुंजाळ हे दोघेही जागीच ठार झाले.

त्यानंतर ट्रक रस्त्याच्या बाजूला शेतात शेतमजुरांच्या घरावर जाऊन धडकला. त्यात आरती दीपक चव्हाण (१८), आकाश राजू मोरे (१४), निकिता ज्ञानेश्वर चव्हाण (१३), नितीन संदीप चव्हाण (१० महिने) हे जखमी झाले. तसेच घराबाहेर उभी असलेली जर्सी गाय ठार होऊन राहत्या घराचे व संसारोपयोगी वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ट्रकचालक मारुती रंगनाथ सुरासे(रा. देवठाण ता. येवला)विरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
आकाश गुंजाळ यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कोठाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक उदय मोहारे, पोलीस हवालदार राजेश घुगे, योगेश शिंदे, कैलास मानकर हे करीत आहेत. 

Web Title: A truck crash kills two on a two-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.