खोल दरीत ट्रक कोसळून चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:11 AM2021-06-04T04:11:59+5:302021-06-04T04:11:59+5:30

इगतपुरी : जुन्या कसारा घाटात ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक ठार तर क्लीनर ...

The truck crashed into a deep ravine, killing the driver | खोल दरीत ट्रक कोसळून चालक ठार

खोल दरीत ट्रक कोसळून चालक ठार

Next

इगतपुरी : जुन्या कसारा घाटात ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक ठार तर क्लीनर जखमी झाला आहे. मुंबईहून नाशिककडे ट्रक क्रमांक एमएच -१५ - जेजी -०२९७ जात असताना जुन्या कसारा घाटात पहाटेच्या साडेतीन वाजेच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक कसारा घाटातील दरीत ३०० फुटावर जाऊन आदळला.

त्यात गाडीचा चालक सोमनाथ भिकाजी उशिरे (वय २३, रा.नाशिक) हा मरण पावला तर गाडीचा क्लीनर तुषार शिंदे (२७) हा गंभीररित्या जखमी झाला. त्याला टोलच्या नाशिक एक्स्प्रेसवेच्या रुग्ण वाहिनीनेे इगतपुरी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. घटनेची माहिती मिळताच मुंबई एक्सप्रेसवेचे गस्त पथक रवि देहाडे त्यांचे सहकारी दीपक मावरिया, धीरज सोनावणे, रवि दुर्गुडे, तसेच घोटी महामार्गाचे

सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. क. हिरे ,

एन एस सोनावणे, एस .पी .सावकार , एच एम गुजरे , पी . सी . आहिरे आदींच्या यांच्या प्रयत्नांनंतर ट्रक चालक सोमनाथ भिकाजी उशिरे व क्लीनर तुषार शिंदे यांना दरीतून काढण्यात आले. पहाटेच्या अंधारामुळे ट्रक चालक व क्लीनर दोघांनाही शोधण्यात अडथळा येत होता.

------------------------

जुन्या कसारा घाटात खोल दरीत पडलेली ट्रक. (०३ इगतपुरी)

===Photopath===

030621\03nsk_20_03062021_13.jpg

===Caption===

०३ इगतपुरी

Web Title: The truck crashed into a deep ravine, killing the driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.