पिंपळगावी कापसाने भरलेला ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 10:11 PM2020-05-08T22:11:11+5:302020-05-09T00:01:19+5:30

पिंपळगाव बसवंत : वैजापूर येथून कापूस भरून गुजरातच्या दिशेने जात असलेला ट्रक पिंपळगाव बसवंत परिसरातील अंबिकानगर येथे उलटला, परंतु लॉकडाउनमुळे रस्त्यावर कुणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.

 A truck full of cotton overturned in Pimpalgaon | पिंपळगावी कापसाने भरलेला ट्रक उलटला

पिंपळगावी कापसाने भरलेला ट्रक उलटला

Next

पिंपळगाव बसवंत : वैजापूर येथून कापूस भरून गुजरातच्या दिशेने जात असलेला ट्रक पिंपळगाव बसवंत परिसरातील अंबिकानगर येथे उलटला, परंतु लॉकडाउनमुळे रस्त्यावर कुणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.
वैजापूरहून गुजरात जाणारा (क्रमांक जीजे ०२ व्हीव्ही ८४८५) कापसाने भरलेला ट्रक वणी- पिंपळगाव रस्त्याचे काम चालू असल्याने व एक बाजूने खोदलेल्या रस्त्यामुळे उलटला. रस्त्याच्याच लागून वस्ती असल्याने ट्रक घराच्या दारापुढे पडला पण बाहेर कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वणी ते पिंपळगाव बसवंत सीमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनधारकांना छोटे-मोठे अपघात व धुळीच्या नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच कोरोना विषाणूमुळे सगळेच लॉकडाउन झाल्याने कासवगतीने सुरू असलेल्या कामाला पूर्णपणे ब्रेक लागला. त्यामुळे लॉकडाउन कधी उघडेल व हा त्रास कधी कमी होईल याची प्रतीक्षा नागरिक करीत आहे. वस्तीजवळील एका बाजूने खोदलेला रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title:  A truck full of cotton overturned in Pimpalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक