टायर फुटल्याने ट्रक उलटून अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:15 AM2021-03-08T04:15:26+5:302021-03-08T04:15:26+5:30

नाशिक : गोविंदनगर-इंदिरानगर भागात मुंबई-आग्रा महामार्गालत रविवारी (दि.७) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास टायर फुटल्याने ट्रक उलटून झालेल्या अपघातामुळे ...

Truck overturns due to flat tire | टायर फुटल्याने ट्रक उलटून अपघात

टायर फुटल्याने ट्रक उलटून अपघात

Next

नाशिक : गोविंदनगर-इंदिरानगर भागात मुंबई-आग्रा महामार्गालत रविवारी (दि.७) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास टायर फुटल्याने ट्रक उलटून झालेल्या अपघातामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली.

पाथर्डी फाट्याकडून मुंबई नाक्याच्या दिशेने जाणारा ट्रक गोविंदनगर-इंदिरानगर बोगद्याजवळ उलटला. मातीची वाहतूक करणाऱ्या या ट्रकचा अचानक टायर फुटल्याने हा अपघात झाला, वाहनचालकाने कसरतीने ट्रकवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु ट्रक सर्व्हिस रोड आणि ॲटग्रेड रोडमधील दुभाजकावर उलटला. वाहन चालकाच्या प्रयत्नामुळे ट्रकचा अन्य वाहनांना अथवा व्यक्तींना धक्का लागला नाही. त्यामुळे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, चालकाची केबिन दाबली गेल्याने, दत्ता हांडे हा तरुण केबिनमध्येच अडकून राहिला. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या पथकाने बंबासह घटनास्थळी दाखल होत कॅबिनममध्ये अडकलेल्या तरुणाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर, एक जेसीबी आणि एक हायड्रोलिक क्रेनच्या मदतीने ट्रक उभा करून सिडको येथील अग्निशमन दलाच्या केंद्रावर आणण्यात आला. या कामगिरीत अग्नीशमन दलाच्या पथकातील वाहन चालक नंदू व्यवहारे यांच्यासह प्रमोद लहामगे, श्रीराम देशमुख, सुनील शिलावट, रवी आमले आदी अग्निशमन दलाच्या जवानांनी ट्रक उभा करण्यासाठी प्रयत्न केले.

===Photopath===

070321\07nsk_49_07032021_13.jpg~070321\07nsk_50_07032021_13.jpg~070321\07nsk_51_07032021_13.jpg

===Caption===

जेसीबी आणि हायड्रोलिक क्रेनच्या साहयाने उलटलेला ट्रक उभा करण्यात आला, दुसऱ्या छायाचित्रात ट्रक उलटल्याने झालेली वाहतूक कोंडी ~जेसीबी आणि हायड्रोलिक क्रेनच्या साहयाने उलटलेला ट्रक उभा करण्यात आला, दुसऱ्या छायाचित्रात ट्रक उलटल्याने झालेली वाहतूक कोंडी ~जेसीबी आणि हायड्रोलिक क्रेनच्या साहयाने उलटलेला ट्रक उभा करण्यात आला, दुसऱ्या छायाचित्रात ट्रक उलटल्याने झालेली वाहतूक कोंडी 

Web Title: Truck overturns due to flat tire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.