कसारा घाटात धावता ट्रक जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 01:20 AM2018-05-29T01:20:27+5:302018-05-29T01:20:27+5:30
मध्य प्रदेशहून मुंबईला कापूस घेऊन जाणाऱ्या ट्रकने सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कसारा घाटात अचानक पेट घेतल्याने कापसासह ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. ट्रकसह १० ते १२ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
इगतपुरी : मध्य प्रदेशहून मुंबईला कापूस घेऊन जाणाऱ्या ट्रकने सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कसारा घाटात अचानक
पेट घेतल्याने कापसासह ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. ट्रकसह १० ते १२ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नवीन कसारा घाटात वळणावर एमएच १८ बीजी १७१६ क्रमांकाच्या धावत्या ट्रकने अचानक पेट घेतला. वाहनचालक जाकीर शेख याने सावध होत जीव वाचवला. महामार्गाचे सुरक्षा अधिकारी विजय राठोड, पेट्रोलिंग कर्मचारी सुनिल सोनवणे, सतीश परदेशी, प्रमोद भटाटे, ऊमेर शेख, गुलाब गवली, समाधान चौधरी, मुजाहीद शेख, विसम शेख, प्रदीप मुर्तडक व महिंद्रा कंपनीच्या अग्निशामक पथकातील फायर आॅफिसर जयेश पाटील व सहकारी सुनील उगले, सोमनाथ लहाणे या पथकाच्या अथक प्रयत्नाने तीन तासानंतर ही आग आटोक्यात आली. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.