मनपाने जप्त केला एक ट्रक भाजीपाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:35 AM2019-02-27T00:35:13+5:302019-02-27T00:35:31+5:30
महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने धडक मोहीम राबवून रस्त्याच्या कडेला अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करीत एक ट्रक भाजीपाला, फळे जप्त करून विक्रेत्यांना हटविले आहे.
सातपूर : महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने धडक मोहीम राबवून रस्त्याच्या कडेला अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करीत एक ट्रक भाजीपाला, फळे जप्त करून विक्रेत्यांना हटविले आहे.
सातपूर परिसरात त्र्यंबकेश्वर रस्त्यावर गुंजाळ पार्क जवळ, अशोकनगर येथील भाजीमार्केट, सातपूर कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट, पाइपलाइनरोडवरील मधुर स्वीटजवळ यासह ठिकठिकाणी रस्त्यावर अनधिकृत विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या जात असून, या तक्रारींची दखल घेत विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन विभागाचे सचिन सनस, विठ्ठल शेळके, रवींद्र कोरडे, पांडू पगार, शशिकांत कोळपकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धडक मोहीम राबवून अशोकनगर येथील रस्त्याच्या कडेला अनधिकृत व्यवसाय करणाºया व्यावसायिकांवर कारवाई करून भाजीपाला, फळे असा एक ट्रक माल जप्त करण्यात आला. तसेच पाइपलाइनरोडवरील मधुर स्वीटजवळील रस्त्यावर व्यवसाय करणाºया व्यावसायिकांवरदेखील कारवाई करण्यात आली.