सत्ताधार्‍याचा खरा चेहरा उघड करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:02 AM2018-01-25T00:02:08+5:302018-01-25T00:02:38+5:30

मनपाच्या आर्थिक परिस्थितीचे कारण पुढे करीत गर्भश्रीमंत थकबाकीदारांना सोडून केवळ राजकीय सूडबुद्धीने सर्वसामान्यांना वेठीस धरणाºयांचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी महागठबंधनतर्फे रविवारी (दि.२८) सायंकाळी सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महागठबंधनचे गटनेता बुलंद एकबाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 The true face of the ruling will be revealed | सत्ताधार्‍याचा खरा चेहरा उघड करणार

सत्ताधार्‍याचा खरा चेहरा उघड करणार

googlenewsNext

आझादनगर : मनपाच्या आर्थिक परिस्थितीचे कारण पुढे करीत गर्भश्रीमंत थकबाकीदारांना सोडून केवळ राजकीय सूडबुद्धीने सर्वसामान्यांना वेठीस धरणाºयांचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी महागठबंधनतर्फे रविवारी (दि.२८) सायंकाळी सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महागठबंधनचे गटनेता बुलंद एकबाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.  यावेळी माजी आमदार मुफ्ती मोहंमद ईस्माईल, जनता दलाचे सचिव मुस्तकीन डिग्नीटी, नगरसेवक अतिक कमाल, मोहंमद आमीन मोहंमद फारूख, तन्वीर जुल्फेखार अहमद, सय्यद सलीम उपस्थित होते.  गत २० जानेवारी (शनिवार) रोजी झालेल्या महासभेत चिराग प्राथमिक शाळेकडे मनपाची भाडे थकल्याने शाळाकडून वसूल करण्यात यावे, मनपाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने भाडे वसुलीस आमचा आक्षेप नाही. सक्तीने वसुली करावी. मात्र इस्लामपुरा येथील मनपाच्या मालकीच्या जागेवर खासगी मक्तेदारास २९ वर्षासाठी लीज कराराने देण्यात आली होती. त्यापोटी १८ महिन्यात मनपास २ कोटी ३५ रुपये चार हप्त्यात अदा करावयाचे होते. मात्र मक्तेदाराने ५१ लाख ५० हजाराचा पहिला हप्ता अदा केलेले नाही.  त्यामुळे एकीकडे धनाढ्य थकबाकीदारांना सोडून सर्वसामान्य नागरिक व शैक्षणिक संस्थांना राजकीय सुडापोटी सत्ताधारी कॉँग्रेस लक्ष्य करीत आहे. त्यांच्या दुटप्पी भूमिका सर्वसामान्य जनतेसमोर मांडण्यासाठी शहरात सभा घेणार असल्याचे एकबाल यांनी सांगितले. माजी आमदार मुफ्ती मोहंमद ईस्माईल म्हणाले की, महापौर सभागृहात दादागिरी करतात. शहरातील अनेक भुखंडावर सत्ताधारी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा अवैध कब्जा आहे. सत्ताधाºयांच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश करणे गरजेचे झाले आहे.

Web Title:  The true face of the ruling will be revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक