ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:31 AM2020-12-12T04:31:13+5:302020-12-12T04:31:13+5:30
एप्रिल व डिसेंबर २०२० मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येथील महसूल विभागाकडून ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया ...
एप्रिल व डिसेंबर २०२० मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येथील महसूल विभागाकडून ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. १५ डिसेंबर रोजी तहसीलदारांकडून निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध केली जाणार आहे, तर २३ ते ३० डिसेंबर (सुटीचा दिवस वगळून) दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामांकन अर्ज दाखल केले जाणार आहेत. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाणार आहे. ४ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत नामांकन अर्ज माघारीची मुदत राहणार आहे. दुपारी ३ वाजेनंतर निवडणूक चिन्हे वाटप करून अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. १५ जानेवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान मतदानप्रक्रिया राबविली जाणार आहे. १८ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन अंतिम निकाल जाहीर केले जाणार आहेत. या निवडणुकांमुळे गावागावांतील राजकारण तापू लागले आहे.