त्र्यंबकेश्वरला ‘बम बम भोले’चा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 01:18 PM2018-08-13T13:18:20+5:302018-08-13T13:18:50+5:30
त्र्यंबकेश्वर : श्रावणातील सोमवार विशेष महत्त्वाचे मानले जातात. यादिवशी शिवक्षेत्राची यात्रा करणे, परिक्रमा करणे. भगवान शिवाला रूद्राभिषेक करणे, उपवास करणे अतिशय पुण्यकारक समजले जाते. हेच औचित्य साधून आज पहिल्याच सोमवारी बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. महापूजेनंतर पालखी मिरवणूक झाली. पवित्र तिर्थराज कुशावर्तावरही भाविकांनी ‘बम बम भोले’चा जयघोष करीत स्रानाचा आनंद घेतला.
त्र्यंबकेश्वर : श्रावणातील सोमवार विशेष महत्त्वाचे मानले जातात. यादिवशी शिवक्षेत्राची यात्रा करणे, परिक्रमा करणे. भगवान शिवाला
रूद्राभिषेक करणे, उपवास करणे अतिशय पुण्यकारक समजले जाते. हेच औचित्य साधून आज पहिल्याच सोमवारी बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. महापूजेनंतर पालखी मिरवणूक झाली. पवित्र तिर्थराज कुशावर्तावरही भाविकांनी ‘बम बम भोले’चा जयघोष करीत स्रानाचा आनंद घेतला.
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे भाविकांच्या सेवेसाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. पोलिसांचाही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून दर्शनासाठी पूर्व दरवाजाने प्रवेश देणे सुरू आहे. भाविकांचे सुलभ व लवकर दर्शन होईल याबाबत मंदिर प्रशासन सज्ज आहे.
पहिल्याच सोमवारमुळे एसटीच्या जादा बसेसही वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्र्यंबकचे बसस्थानक भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहे. गर्दीच्या नियोजनाबाबत विश्वस्त दिलीप तुंगार, प्रशांत गायधनी व संतोष तुंगार यांच्यासह प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी राजाभाऊ जोशी आदी लक्ष ठेवून आहेत.