‘भरोसा सेल’चा प्रचार-प्रसार व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:29 AM2021-02-21T04:29:19+5:302021-02-21T04:29:19+5:30

राष्ट्रीय महिला आयोगाच्या केंद्रीय सदस्य चंद्रमुखी देवी या शनिवारी नाशिक दौऱ्यावर होत्या. त्यांनी महिलांविषयीच्या विविध तक्रारींसंदर्भात पोलीस आयुक्तालयात आढावा ...

‘Trust Cell’ should be promoted | ‘भरोसा सेल’चा प्रचार-प्रसार व्हावा

‘भरोसा सेल’चा प्रचार-प्रसार व्हावा

Next

राष्ट्रीय महिला आयोगाच्या केंद्रीय सदस्य चंद्रमुखी देवी या शनिवारी नाशिक दौऱ्यावर होत्या. त्यांनी महिलांविषयीच्या विविध तक्रारींसंदर्भात पोलीस आयुक्तालयात आढावा घेतला. यावेळी पाण्डेय यांच्याशी त्यांनी चर्चा केली. विविध प्रकारे त्रासलेल्या महिला जेव्हा पोलिसांकडे मनामध्ये काही अपेक्षा घेऊन येतात, तेव्हा त्यांना सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. तसेच महिलांच्या संबंधित तक्रारी दाखल करुन घेण्यास कोणत्याही प्रकारे पोलिसांकडून विलंब होता कामा नये, असेही देवी यांनी यावेळी सांगितले. अनेकदा पोलीस ठाण्यांकडून हद्दींचा प्रश्न पुढे करत महिलांची तक्रार दाखल करण्यासाठी विलंब लावला जातो, हे गैर असल्याचे त्या म्हणाल्या. महिला आयोगाकडून प्राप्त होणाऱ्या तक्रार अर्जाविषयी बोलताना त्या म्हणाल्या की जर तक्रार अर्ज आपल्या हद्दीतील नसतील तर उलट टपाली ते पुन्हा कार्यालयाला कळविण्यात यावे, जेणेकरून संवादात कोठेही अंतर निर्माण होणार नाही. महिलांविषयीच्या तक्रारींचा नाशिक शहरासह ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयांद्वारे आढावा जाणून घेतला असता शहरात व ग्रामीण भागात महिलांविषयक तक्रारी दाखल करून त्यांच्या निपटाऱ्याबाबत देवी यांनी समाधान व्यक्त केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. यावेळी बैठकीला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस.पी. पाटील, उपायुक्त विजय खरात, सहायक आयुक्त (गुन्हे) मोहन ठाकूर, सहायक आयुक्त (ग्रामीण) श्याम निपुंगे, शहर महिला सुरक्षा विभागाच्या संगीता निकम आदी उपस्थित होते.

--इन्फो--

सायबर गुन्ह्यांबाबत हवी जागरुकता

अलीकडे महाविद्यालयीन विद्यार्थिनींसह विवाहित महिलासुध्दा सायबर गुन्हेगारीच्या बळी ठरत आहेत. इंटरनेटच्या विश्वात वावरताना अपुऱ्या माहिती व अज्ञानापोटी महिला, युवतींचा छळ, आर्थिक फसवणुकीसह अश्लील संवाद व लैंगिक अत्याचारप्रकरणी शहरासह जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती करण्याची गरज चंद्रमुखी देवी यांनी व्यक्त केली. सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी महिला, युवतींमध्ये पोलीस खात्याच्या सायबर सेलकडून जागृती होणे अपेक्षित असल्याचे त्या म्हणाल्या.

--

फोटो आर वर २०पोलीस नावाने सेव्ह आहे.

Web Title: ‘Trust Cell’ should be promoted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.