सुरगाण्यात माकपचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 06:14 PM2019-02-03T18:14:14+5:302019-02-03T18:14:38+5:30
सुरगाणा : अज्ञात समाजकंटकांनी येथील माकपाच्या कार्यालयाला मध्यरात्रीस आग लावण्याच्या केलेल्या प्रयत्नात कार्यालयातील झेरॉक्सच्या दुकानास आग लागून सर्व साहित्य भस्मसात होऊन मोठे आर्थिक नुकसान केले आहे. मटक्यासह सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी केल्यानेच हा प्रकार घडवून आणला असल्याचे माकपने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

येथील पोलिस ठाण्यापासून जेमतेम शंभर पावलांवर माकपाचे तालुका कार्यालय असून याच कार्यालयात बाहेरील बाजूने माणीचे सरपंच योगेश जाधव (रा.हनुमंतमाळ) यांचे झेरॉक्सचे दुकान आहे. पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आग लावून माकपचे कार्यालय जाळण्याचा कट करून त्यात पक्ष कार्यालयाच्या बाहेरील झेरॉक्स दुकान जळून खाक झाले आहे. पक्षाच्या कार्यालयात आगीच्या ज्वाळा पोहचल्याने कागदपत्रांचे नुकसान झाले आहे. शहरासह तालुक्यात असे प्रकार यापूर्वी देखील घडले आहेत. मात्र त्या घटनांमधील जाळपोळ करणारे संशयित अद्यापही पोलिसांना सापडले नाहीत. शहरासह तालुक्यात मटका व ईतर अवैध धंदे पोलिसांच्या आशीर्वादानेच सुरू आहेत. हे सर्व अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीचे निवेदन पक्षाच्याच तरूणांनी तीन चार दिवसांपूर्वी पोलिसांना दिले होते. त्याचाच राग धरून अवैध धंदे करणाऱ्यांनी आमच्या पक्ष कार्यालयास आग लावली आहे. सुरगाणा व बार्हे पोलिस ठाण्याच्या पोलिसांना अवैध धंदे करणारे व त्यानंतर त्या धंद्याबद्दल तक्र ार केल्यामुळे तक्र ारदारांच्या वाहनांना आग लावणारे समाजकंटक माहित आहेत. त्यामुळे आम्ही पोलिसांना याप्रकरणात सामिल असलेल्या समाजकंटकांना येत्या सात फेब्रुवारी पर्यंत अटक करून ठोस कारवाईची मागणी माकपचे आमदार जे.पी. गावित यांचेसह पक्षाचे पदाधिकारी सुभाष चौधरी, रामजी गावित, योगेश जाधव, सुरेश गवळी, उत्तम कडू, सोमा शेवरे आदींनी निवेदनाद्वारे केली आहे. झेरॉक्स दूकान चालक व माकपचे सरपंच योगेश जाधव यांनीही जाळपोळ करणार्या अज्ञातांविरोधात फिर्याद दिली आहे.