अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 10:50 PM2019-07-10T22:50:58+5:302019-07-10T22:51:35+5:30
विंचूर : विंचूरसह परिसरात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीने आक्र मण केले आहे. अळीने पिकाचे नुकसान केल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाच्या पथकाकडून शेतात जाऊन औषधांची माहिती देऊन शर्तीचे प्रयत्न केले जात आहे.
विंचूर : विंचूरसह परिसरात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीने आक्र मण केले आहे. अळीने पिकाचे नुकसान केल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाच्या पथकाकडून शेतात जाऊन औषधांची माहिती देऊन शर्तीचे प्रयत्न केले जात आहे.
हनुमाननगर गावातील अरुण निमसे, सुनील सालगुडे, रवींद्र सालगुडे, तसेच विष्णुनगरमध्ये हरिभाऊ देसले, मच्छिंद्र गावडे, शांताराम घायाळ आदींसह शेतकऱ्यांच्या मक्यावर अळीने आक्रमण केले आहे.
मक्याच्या पोंग्यातच अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्याने हे पीक वाया जाऊन आर्थिक फटका शेतकºयांना बसणार आहे. गतवर्षी पावसाअभावी मका पीक कमी प्रमाणात होते. त्यामुळे परिसरात जनावरांच्या चाºयाचा तुटवडा अधिकच जाणवला.
अळीचा अटकाव करण्यासाठी कृषी विभागामार्फत शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. कृषी अधिकारी एस. व्ही. पाटील, कृषी सहायक संगीता जाधव या शेतात जाऊन अळीचा बंदोबस्त कसा करता येईल, यासंबंधी शेतकºयांना माहिती देत आहेत.
यावेळी ज्ञानेश्वर भडांगे, नवनाथ दरेकर, कृष्णा गुंजाळ, बापू दरेकर, संजय जाधव, बाळासाहेब ठुबे, दिलीप ठुबे, आबा दरेकर, सागर गुंजाळ, अशोक दरेकर, संदीप खुळे, रमेश सालगुडे, अरु ण कडलग, नामदेव देवकर, महेंद्र गुंजाळ, भूषण दरेकर, ज्ञानेश्वर सालगुडे, तुकाराम कडलग, जितेंद्र खलाटे, अमोल गुंजाळ आदी शेतकरी उपस्थित होते.शेतकºयांचे मोठे नुकसानवरुणराजाची परिसरावर कृपादृष्टी झाल्याने जनावरांच्या चाºयाची सोय व्हावी या उद्देशाने शेतकºयांनी तातडीने मका पीक घेतले आहे; मात्र अमेरिकन अळीचा हल्ला या पिकावर झाल्याने मोठे नुकसान शेतकºयांना सोसावे लागणार आहे.