बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 06:20 PM2018-10-25T18:20:49+5:302018-10-25T18:21:50+5:30

सायखेझ : शिंगवे (ता.निफाड) येथील युवा शेतकरी भाऊलाल रामभाऊ ङेर्ले ऊसाला पाणी लावण्यासाठी घाई घाईने शिंगवे शिवारातील आपल्या शेताकडे निघाले. रस्त्याने जात असतांना अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या ऊसाच्या शेतातून बिबट्याचे आगमन झाले. सोबत दोन बछङेही होते. बिबट्याला पाहताच त्यांनी गाडी जागेवर थांबली.

Trying to attack the leopard's farmer ... | बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न...

बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न...

Next
ठळक मुद्देबछड्यासह ठाण मांडून रस्त्यावर बसला अर्धा तास

सायखेझ : शिंगवे (ता.निफाड) येथील युवा शेतकरी भाऊलाल रामभाऊ ङेर्ले ऊसाला पाणी लावण्यासाठी घाई घाईने शिंगवे शिवारातील आपल्या शेताकडे निघाले. रस्त्याने जात असतांना अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या ऊसाच्या शेतातून बिबट्याचे आगमन झाले. सोबत दोन बछङेही होते. बिबट्याला पाहताच त्यांनी गाडी जागेवर थांबली.
हातपाय थरथर कापायला लागले.
बिबट्याची मादी आपल्या बछङ्यांसह आरामात रस्त्यावर विसावली. भाऊलाल यांना हालताही येईना. काही वेळातच ती भाऊलाल यांच्यावर गुरगूरायला लागला. बिबट्या काही धेळाने उठला आणि एक मोठी ङरकाळी फोडली आणि भाऊलाल यांच्याकडे यायला लागली. बछडे मात्र जागेवर बसून होते.भाऊलाल यांनी समयसुचकता साधत सोबत असणारे फावङे मादीच्याच्या दिशेने उगारले आणि आरडा-ओरड केला. त्यामुळे बिबट्या थबकला. आणि काही वेळानंतर बछड्यांना सोबत घेत पुन्हा ऊस शेतात परत मार्गस्थ झाला. अर्धा तास समोर मृत्यूला सामोरे गेलेले भाऊलाल घाबरुन गेल्या पावली परतले. त्यानंतर तातङीने वन परिक्षेत्रपाल संजय भंडारी यांना घटनेची माहीती देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पहाणी करुन लगेचच पिंजरा लावला. पण पिंजºयात सावजच ठेवले नाही. केवळ शेतकºयांना बोकड आणण्याचे फर्मान सोडून वनविभागाचे कर्मचारी निघून गेले. मग शेतकरीही बोकडाच्या शोधात रमले मात्र अजूनही त्या पिंजºयात ठेवण्यासाठी सावज सापडलेले नाही. कारण बोकड्यासाठी पाच हजार रूपये देणार कोण ? या प्रश्नात पिंजरा मात्र तसाच ठेवण्यात आला. आता वनविभाग मोकळ्या पिंजºयात बिबट्याची जेरबंद होण्याची आस लावून बसलयं..... आणि बिबट्याच्या दहशतीने शेतकरी शेतात जाण्यास धजावत नाही.

शिंगवे शिवारात बिबट्यांची दहशत कायम असतांना वनविभाग फक्त पिंजरा लावून मोकळे होतात. त्याच्यात सावज ठेवण्यासाठी स्थानिकांना सांगितले जाते. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तातडीने ठोस उपाय योजना करावी अशी शेतकरी मागणी करीत आहेत.
भाऊलाल ङेर्ले, शेतकरी शिंगवे, ता.निफाड.

 

Web Title: Trying to attack the leopard's farmer ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.