गॅस कटरने बॅँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 01:34 AM2017-08-11T01:34:04+5:302017-08-11T01:34:57+5:30

माळेगाव औद्योगिक वसाहतीतील बॅँक आॅफ इंडियाच्या शाखेत अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करण्याचा प्रयत्न केला. गॅस कटरने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न झाला मात्र तिजोरी न फुटल्याने बॅँकेतील ६९ लाख रुपये चोरी होता होता वाचले. गॅस कटरने तिजोरी फोडण्याच्या धाडसी प्रयत्नामुळे बॅँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Trying to break the bank safe with gas cutter | गॅस कटरने बॅँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न

गॅस कटरने बॅँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्दे६९ लाख रुपये चोरी होता होता वाचलेधाडसी प्रयत्नामुळे बॅँकिंग क्षेत्रात खळबळ खिडकीची जाळी व गज कटरने कापले

सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीतील बॅँक आॅफ इंडियाच्या शाखेत अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करण्याचा प्रयत्न केला. गॅस कटरने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न झाला मात्र तिजोरी न फुटल्याने बॅँकेतील ६९ लाख रुपये चोरी होता होता वाचले. गॅस कटरने तिजोरी फोडण्याच्या धाडसी प्रयत्नामुळे बॅँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
नाशिक-पुणे महामार्गावर माळेगाव औद्योगिक क्षेत्रात बॅँक आॅफ इंडियाची शाखा आहे. बुधवारी सायंकाळी बॅँकेचे कर्मचारी शिल्लक असलेली ६९ लाख रुपयांची रोकड कॅशरूमधील गोदरेज तिजोरीत ठेवून शटरला कुलूप लावून गेले होते. गुरुवारी सकाळी ९ वाजता शाखेचे शिपाई सदाशिव जाधव साफसफाई करण्यासाठी बॅँकेत आले. त्यावेळी त्यांना पश्चिमेकडील भितींच्या खिडकीची जाळी व गज कटरने कापलेले दिसले. संगणकाच्या वायरी तोडलेल्या होत्या व सीसीटीव्ही कॅमेरा वाकवलेला दिसला. त्यामुळे बॅँकेत चोरीचा प्रयत्न झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी बॅँक मॅनेजर विठ्ठल चव्हाण यांना फोन करून घटनेची माहिती दिली. मॅनेजर चव्हाण शाखेत आल्यानंतर त्यांना कॅशरूमच्या शटरचे चॅनल तोडून त्याला लावलेले कुलूप तोडल्याचे दिसून आले. याप्रकरणी अज्ञात चोरट्यां-विरोधात चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार राम भवर अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Trying to break the bank safe with gas cutter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.